jakhu mengal corona.jpg 
नाशिक

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या वडिलांच्या मनात कोरोना झाल्याची भिती...मुलांच्या लक्षात येतात सर्व काही संपलं होतं.. काय घडले?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : मेंगाळ हे बाधित रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कात असल्या कारणाने त्यांना स्पेशल रुम मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन,आरोग्य सेविका, आशा वर्कस, अंगणवाडी सेविका सर्वपरी प्रयत्न करत होते. त्यांना लागणारे औषध उपचार, बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ व ग्रामपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून दिले होते. 

कोरोनाच्या भितीपोटी उचलले टोकाचे पाऊल

सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील जाखु मेंगाळ हे दोडी येथे सापडलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना (ता.१३ जून )रोजी संध्याकाळी भोकणी येथील मराठी शाळेत असलेल्या कॉरंटाईन सेंटरमधे ठेवले होते. मेंगाळ कुटुंबातील १७ जणांपैकी १२ सदस्य  कॉरंटाईन करण्यात आले होते. तर ५ सदस्यांना होम कॉरंटाईन  करण्यात आले होते. मेंगाळ हे बाधित रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कात असल्या कारणाने त्यांना स्पेशल रुम मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन,आरोग्य सेविका, आशा वर्कस, अंगणवाडी सेविका सर्वपरी प्रयत्न करत होते. त्यांना लागणारे औषध उपचार, बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ व ग्रामपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून दिले होते. आणि याच कोरोनाच्या भितीमुळे जाखु मेंगाळ (वय ५७) यांनी (ता.२३) पहाटे ५ वाजता कोरोनाच्या भिती पोटी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला
आज पहाटे ५ च्या दरम्यान कोरोना झाल्याच्या भीती पोटी मराठी शाळेतील कॉरंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अरुण वाघ यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधुन माहिती दिली. वाघ यांनी आरोग्य विभाग,व पोलीसांना माहिती दिली.वावी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  रणजित गलांडे यांनी पंचनामा करुन मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT