Death News esakal
नाशिक

Nashik News: छतावरील पाण्याच्या टाकीत एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंबड भागातील वनश्री कॉलनी येथे राहते घरातील छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भूषण भारंबे (४१), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (One commits suicide in rooftop water tank Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बुधवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूषण हे घरात दिसत नसल्याने घराचे छतावर गेले असता, एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत भूषण यांचा मृतदेह दिसला. मयत भूषण यांचे आईवडील घरात होते, व पत्नी नोकरीवर गेलेल्या होत्या.

यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भूषण यांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंगावर कुठलेही व्रण नसल्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष संगम करीत आहे. मयत भूषण हे खासगी नोकरीला होते. तर त्याची पत्नीही खासगी नोकरी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

SCROLL FOR NEXT