Male and female devotees reciting Gurucharitra in Gurupeeth and Gurupitha General Manager Chandrakatdada More while guiding. esakal
नाशिक

Shri Swami Samarth Gurupeeth : प्रत्येक शनिवारी एकदिवसीय श्रीगुरुचरित्र पारायण : चंद्रकांतदादा मोरे

सकाळ वृत्तसेवा

Shri Swami Samarth Gurupeeth : गुरुमाउलींच्या आशीर्वादाने व त्यांनीच सूचना केल्यानुसार त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात महिन्यातील प्रत्येक शनिवारी श्रीगुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करण्याची पर्वणी सेवेकरी, वारकरी, भाविकांना मिळणार आहे.

दोन शनिवारपासून या सेवेस प्रारंभ झाला असून, राज्यभरातील महिला-पुरुष सेवेकरी, भाविक मोठ्या उत्साहात आणि मनोभावे उत्स्फूर्तपणे या सेवेत सहभागी होत आहे.

दर शनिवारी दीड ते दोन हजार महिला-पुरुष पारायण करून आध्यात्मिक सेवेचा आनंद आणि समाधान घेत असल्याची माहिती समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली. (One day Sri Gurucharitra Parayanam every Saturday of month at Shri Swami Samarth Gurupeeth nashik news)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गात सक्रिय लाखो सेवेकरी आणि श्रीदत्त भक्त श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे पारायण वर्षभर सातत्याने आपापल्या घरी, समर्थ केंद्रामध्ये करतच असतात.

वेगवेगळ्या मेळाव्यात, केंद्रात होणारे अखंड नामजप, यज्ञ सप्ताह यानिमित्त देशभरातील लाखो सेवेकरी नियमितपणे श्रीगुरुचरित्राची लाखो पारायणे करतात, अशी माहिती देऊन चंद्रकांतदादा मोरे म्हणाले, की अखंड नामजप यज्ञ सप्ताहात होणारी पारायणे ही सात दिवसांची असतात.

रोजच्या कामामुळे आरोग्यविषयक समस्या किंवा इतर अडचणीमुळे सात दिवसांचे पारायण ज्यांना शक्य होत नाही, पण तीव्र इच्छा आहे, अशा भाविक व सेवेकरी यांच्यासाठी गुरुमाउली यांनी या एकदिवसीय पारायणाची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रारंभीच या सेवेस खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे.

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाची महती सांगताना चंद्रकांतदादा म्हणाले, की सर्व भाविक या ग्रंथास पाचवा वेद म्हणतात. या जगाचे चालक, मालक, पालक श्रीदत्तात्रेय महाराज यांच्याशी जवळीक साधून आपल्या भौतिक, आध्यात्मिक इच्छा-आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी श्रीगुरुचरित्र हा सहज व सोपा मार्ग आहे.

या मार्गाने आपलं आयुष्य सुकर झाल्याचा कोट्यवधी भाविकांचा आजवर अनुभव असल्यामुळे ही सेवा एका दिवसात रुजू करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT