accident  sakal
नाशिक

Nashik Accident News: कंटेनर-मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड-मालेगाव रस्त्यावर कंटेनरने मोटारसायकलला कट मारल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन युवकांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली.

या अपघातासंदर्भात कंटेनरचालकाविरुद्ध चांदवड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One dead one critically injured in container motorcycle accident Nashik News)

सावकारवाडी (ता. मालेगाव) येथील सुनील प्रमोद दळवी (वय २२) आणि अंकुश चिमण गोधडे (वय १८) हे दोघेजण मोटारसायकलवरून सावकारवाडी येथून कुंदलगाव (ता. चांदवड) कडे जात असताना रात्रीच्या सुमारास मनमाडकडून मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरने कानडगाव शिवारातील हनुमान मंदिराजवळ मोटारसायकलला कट मारल्याने,

मोटारसायकलचा अपघात होऊन मोटारसायकलवरील सुनील दळवी यांच्या डोक्याला, हातापायास व छातीस मार लागला तर अंकुश गोधडे जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता, सुनील दळवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अंकुश गोधडेवर उपचार सुरू आहेत.

अंकुश गोधडे यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी श्री. पालवी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT