Death News esakal
नाशिक

Nashik : ‘आदिवासी’च्या नवीन वसतीगृहाच्या आठव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यु

नरेश हाळणोर

नाशिक : पेठरोडवरील आरटीओ ऑफिसजवळ असलेल्या आदिवासी विकास भवन येथे सुरू असलेल्या नवीन वसतीगृहाच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी गज फिटिंगचे काम सुरू असताना आठव्या मजल्यावरून खाली पडलेल्या युवकाचा मृत्यु झाला. (One died after falling from eighth floor of new hostel for adivasi vikas bhavan Nashik Latest Marathi News)

रजाऊल हक सुलतान शेख (२३, रा. आदिवासी कॉलनी, आरटीओ ऑफिसजवळ, पंचवटी. मूळ रा. बिहार) असे मयत युवकाचे नाव आहे. आदिवासी कॉलनीमध्ये आदिवासी विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नवीन बहुमजली वसतीगृह बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी आठव्या मजल्यावर स्टील फिटिंगचे काम सुरू असताना, रविवारी (ता. १३) दुपारी साडेतीन वाजेच्यासुमारास मजूर रजाउल हक शेख याचा तोल गेला आणि खाली पडला.

यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकारयाने तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलीस नाईक लिलके हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Health Workers: राज्यात ४,१९३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT