Nashik Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ऑनलाईन फसवणूक झालेले दीड लाख मिळाले परत; तक्रारदाराने मानले सायबर पोलिसांचे आभार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : अंबड परिसरातील एकाला क्रेडीट कार्डवरून संशयित ऑनलाईन भामट्याने सुमारे दीड लाखांना परस्पर गंडा घातला होता.

मात्र त्यांनी सायबर पोलिसांकडे तात्काळ तक्रार करीत पाठपुरावा केल्याने भामट्याने गंडा घातलेले पैसे पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात वर्ग करण्यात नाशिक सायबर पोलिसांना यश आले. यामुळे तक्रारदाराने सायबर पोलिसांचे आभार मानले. (one half Lakh recovered online complainant thanked cyber police Nashik Cyber ​​Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अतुल गोविंदा सोनार (रा. मोरवाडी, अंबड) यांची गेल्या ३० मे रोजी ऑनलाइन फसवणूक झाली होती. संशयित ऑनलाईन भामट्याने सोनार यांच्या क्रेडीट कार्डचा वापर करून त्यावरून १ लाख ४८ हजार ८९४ रुपये परस्पर काढून घेतले होते.

सदरची बाब लक्षात येताच सोनार यांनी तातडीने नाशिक सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, प्रभारी निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे अंमलदार संतोष गोसावी, केद्राबाई पठारे, सोनाली गुंजाळ यांनी तातडीने तांत्रिक विश्लेषण करून आर्थिक व्यवहार झालेल्या कंपनीस ई-मेल करीत व्यवहार थांबविले.

त्यानुसार सततच्या पाठपुराव्यामुळे भामट्याने केलेले आर्थिक व्यवहार थांबविण्यात आले. त्यानंतर सोनार यांना १ जुलै रोजी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याने त्यांना पुन्हा मिळाले. याबाबत सोनार यांनी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT