Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik : अनैतिक संबंधातून एकाच्या गळ्यावर सुऱ्याने वार

नरेश हाळणोर

नाशिक : विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून (Immoral relationship) संशयिताने साथीदाराच्या मदतीने एकाच्या गळ्यावर सुऱ्याने वार (Attack with knife) केल्याची घटना आगर टाकळी परिसरात रविवारी (ता.३) रात्री घडली. गंभीर जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून उपनगर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित व जखमी परप्रांतिय आहेत. (One stabbed in neck in an immoral relationship Nashik Crime News)

इरफान हुबे शेख (२४, रा. नारायण बापूनगर, उपनगर. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे जखमी युवकाचे नाव आहे. तर, काळुराम उर्फ कैलास गंगाधर रावत, रामा राया रावत (२५, रा. लोखंडे चाळ, उपनगर. मूळ रा. राजस्थान) असे संशयितांची नावे आहे. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला इरफानचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय होता. रविवारी (ता.३) रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित व साथीदाराने आगरटाकळी येथील उसाच्या शेतीजवळ इरफान याच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केले आणि संशयित पसार झाले. आसपासच्या नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यास आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सिद्धेश्‍वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून संशयितांची दुचाकी (आरजे ०९ एसएक्स ३९९२) मिळून आली. त्यावरून तपास केल्यानंतर सदरचा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे समोर आले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितासह तिघांना ताब्यात घेतले असून, उपनगर पोलिसात प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भालेराव हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेड ते पूर्णा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT