corona update corona update
नाशिक

जिल्‍ह्यात 1 हजार 661 पॉझिटिव्‍ह, दोन हजार 084 कोरोनामुक्‍त

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेले कोरोना बाधितांची संख्या घटली असतांना मृत्‍यूसत्र सुरुच आहे. बुधवारी (ता.19) जिल्‍ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, यात सर्वाधिक 22 मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत.

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेले कोरोना बाधितांची संख्या घटली असतांना मृत्‍यूसत्र सुरुच आहे. बुधवारी (ता.19) जिल्‍ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, यात सर्वाधिक 22 मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत. जिल्‍ह्यात एक हजार 661 पॉझिटिव्‍ह आढळले असून, दोन हजार 084 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत 463 ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात 18 हजार 030 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (One thousand 661 corona patients found in Nashik district)



बुधवारी झालेल्‍या चाळीस मृतांमध्ये नाशिक ग्रामीणमधील 28 तर नाशिक शहरातील अठरा मृतांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये सर्वाधिक सहा बळी सिन्नर तालुक्‍यातील आहेत. निफाड तालुक्‍यातील चार, दिंडोरी व बागलाण तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन, येवला व नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन तर इगतपुरी व सुरगाणा तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 605, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 049, मालेगावच्‍या 7 बाधितांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. कोरोनामुक्‍त रुग्‍ण संख्येत नाशिक शहरात 858, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 166, मालेगाव महापालिका क्षेत्रातील साठ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत चार हजार 232 अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 679, नाशिक शहरातील एक हजार 234 तर मालेगावच्‍या 319 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 931 रुग्‍ण दाखल झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 779 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 131 तर मालेगावच्‍या दहा रुग्‍णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT