corona update google
नाशिक

जिल्‍ह्यात 1 हजार 887 पॉझिटिव्‍ह, तर 2 हजार 57 रुग्‍णांची कोरोनावर मात

गेल्‍या काही दिवसांपासूनची आकडेवारी लक्षात घेता, परीस्‍थितीत सुधारणा होत आहे. शुक्रवारी (ता.14) दिवसभरात एक 887 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

अरुण मलानी

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासूनची आकडेवारी लक्षात घेता, परीस्‍थितीत सुधारणा होत आहे. शुक्रवारी (ता.14) दिवसभरात एक 887 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर दोन हजार 057 रुग्‍णांनी कोरोनावर (Coronavirus) यशस्‍वीरीत्या मात केली आहे. 36 बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. जिल्‍ह्यात सद्यस्‍थितीत 20 हजार 487 बाधित उपचार घेत आहेत. (one thousand 887 new corona patients found in Nashik district)

शुक्रवारी (ता.14) नाशिक महापालिका क्षेत्रात 965, नाशिक ग्रामीण क्षेत्रात 915, तर मालेगावला अवघ्या सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 195, नाशिक ग्रामीणमधील 807, मालेगाव क्षेत्रात वीस तर जिल्‍हा बाहेरील 35 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. 36 मृतांमध्ये नाशिक शहरातील तेरा, नाशिक ग्रामीणमधील वीस तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील तिघांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये निफाड तालुक्‍यात चार, बागलाण व सिन्नर तालुक्‍यात प्रत्‍येकी तीन, मालेगाव ग्रामीण, कळवण तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन तर चांदवड, दिंडोरी, नाशिक तालुक्‍यासह येवला तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला.

जिल्‍ह्‍यातील चार हजार 542 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 821, नाशिक शहरातील एक हजार 549 तर मालेगावच्‍या 172 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार 338 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार 111 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोळा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 179, मालेगावच्‍या 27 रुग्‍णांचा समावेश होता.

चौदा लाख चाचण्यांचा जिल्‍ह्‍यात टप्पा पूर्ण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतांना चाचण्यांच्‍या संख्येतही वाढ केलेली होती. शुक्रवारी जिल्‍ह्‍यातील चाचण्यांच्‍या संख्येने चौदा लाखांचा आकडा ओलांडला आहे. आत्तापर्यंत चौदा लाख 9 हजार 396 चाचण्या झाल्या आहेत. यात तीन लाख 66 हजार 635 बाधितांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून हे प्रमाण 26.01 टक्‍के इतके आहे.

(one thousand 887 new corona patients found in Nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT