नाशिक

दुष्काळात कांदा लागवडीसाठी एकरी १४ हजार रुपये मजुरी; भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त

CD
मेन जवळ स्वतंत्र लावणे ---------------- कांदा लागवडीसाठी एकरी १४ हजार रुपये मजुरी ग्रामीण भागातील अनियमित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त जुनी शेमळी, ता. १७ : यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे, विहिरींना पुरेसे पाणी नसुन शेतकरी जेमतेम उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचन अथवा उपलब्ध पाण्यावर लाल कांद्याची लागवड करीत आहेत. अजमीर सौंदाणे ( ता .बागलाण ) येथील परिसरात कांदा लागवडीसाठी मजुरांना एकरी १४ हजार रुपये मजुरी मोजावी लागत आहे . वीज भारनियमन, मजूरटंचाई ,वाढलेली मजुरीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत ह्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या कमी होण्याची शक्यत आहे. त्यातच जेमतेम पाण्यावर शेतकरी कांदा लागवड करित आहे. खराब हवामान व परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोप खराब झाले. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. विजेच्या टंचाईबरोबरच विजेच्या भारनियमनाला ही शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. मजुरीचे दरात वाढ कांदा लागवडीसाठी १३ ते १४ हजार रुपये एकरी मजुरी द्यावी लागत आहे. आदिवासी मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेर गावी असल्याने परिसरात मजूर टंचाई आहे.त्यामुळे कांदा लागवडसाठी शेतकऱ्यांना जादा पैसे देवून इतर गावातून बाहेरुन मजूर आणावे लागत आहेत. त्यातच आता रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करत असल्याचे चित्र आहे. ---- यावर्षी दुष्काळी परिस्थिती असुन जेमतेम पाण्यावर शेतकरी कांदा लागवड करत आहे. मात्र भारनियमामुळे शेतकरी त्रस्त आहे. परिसरात सकाळी ७ ते ३ भारनियमन आहे. तर १० वाजता येत असल्याने ९ ते ५ वेळेत वीज पुरवठा करण्यात यावा. - विकास पवार, शेतकरी.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT