SAKAL - 2021-03-19T101530.047.jpg
SAKAL - 2021-03-19T101530.047.jpg 
नाशिक

करपा रोगाच्या प्रादुर्भावाने कांदा उत्पादक चिंतित; शेतकरी हवालदिल  

मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : कसमादे भागात या वर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली असली तरी या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. औषध फवारणी करूनही करपा जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

वातावरणातील बदलांमुळे कसमादेतील शेतकरी हवालदिल 
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची लागवड केली आहे; परंतु जानेवारीत झालेल्या अवकाळीमुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला होता. ज्या भागात गारपीट झाली, तेथील कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्या अवकाळीचा मोठा फटका देवळा तालुक्यातील लोहोणेर, सटवाईवाडी, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा शिवारातील कांद्यापिकाला बसला. त्याचा अनिष्ट परिणाम आता दिसून येत आहे. परिसरात अंदाजे ४० ते ५० टक्के लागवडीखालील क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचे प्रमाण दिसून येत आहे. इतर भागातही करपा रोग कमी-अधिक प्रमाणात आहेच. कांद्याची पात पिवळसर पडून कांद्याची वाढ खुंटते. यामुळे अपेक्षित उत्पादन निघत नाही. 

अस्मानी अन् सुलतानी संकट 
वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. शेतकरी दिवसरात्र एक करून कसेबसे कांद्याचे पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. हे कमी की काय वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाचे संकट आ वासून उभे असल्याने कांदा उत्पादकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आता जर पाऊस आला तर त्यात कांद्याचे मोठे नुकसान होऊ शकते. करपा रोगामुळे बाधित झालेल्या उन्हाळ कांद्याचे शिवार पंचनामे करण्यात येऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT