onion Market esakal
नाशिक

नाशिक : 50 शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये गिरविले कांदाप्रक्रियेचे धडे

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) गुजरातमध्ये (Gujarat) झालेल्या अभ्यास दौऱ्यात (Study visit) शेतकऱ्यांनी कांदा प्रक्रिया उद्योगाचे धडे गिरविले. त्यात येवला (Yeola), सिन्नर (Sinnar), नांदगाव (Nandgaon), कळवण (Kalavan), बागलाण (Baglan), देवळा (Devla), चांदवड (Chandwad), इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील ५० शेतकरी सहभागी झाले होते. कृषी संशोधन केंद्रे, मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती व कांदा प्रक्रिया उद्योगांना भेटी देण्यात आल्या.

भावनगर (Bhavnagar) जिल्ह्यात कांदा उत्पादनासह प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. बगदाना (ता. महुवा) भागातील शेतकरी पोपटभाई सभाडिया यांच्या शेतीला भेट देऊन खरिपातील (Kharif) लाल व पांढऱ्या कांद्याच्या लागवडीपासून ते काढणीपश्चात व्यवस्थापन (Management) याबाबतची माहिती घेतली. तसेच महुवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल व पांढऱ्या कांद्याची आवक, प्रती २० किलोचा एक मण या पद्धतीने होणारे लिलाव याबाबत बाजार समितीचे सचिव विशाल पंचानी यांनी कामकाज समजावून सांगितले. आधुनिक पद्धतीने कांदा प्रतवारीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बाजार समितीचे सभापती घनश्‍याम पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद झाला. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे महुवाचे तंत्र अधिकारी महेंद्र मुखेडकर यांनी कांदा पीक नियोजनाची माहिती दिली. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, नीलेश चौधरी यांनी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते.

दोन प्रकल्पांची पाहणी

कांदा प्रक्रियेच्या महुवा येथील महाराजा व प्रिया या दोन प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी करत कांदा भुकटी उत्पादन पद्धतीसंबंधी कामकाज पाहिले. उद्योजक (Entrepreneur) घनश्याम कोरडिया यांनी सादरीकरण केले. शेतकऱ्यांनी भारतीय कृषी संशोधन केंद्र संचलित औषधी व सुगंधी वनस्पती महासंचालनालय (आणंद), आनंद कृषी विद्यापीठ, जुनागड (Junagadh) कृषी विद्यापीठ संचलित महुवा नारळ संशोधन केंद्राला भेटी दिल्या. गुजरातमधील देवभूमी द्वारका (Dwarka) जिल्ह्यातील धने उत्पादन व बीजोत्पादन तसेच दभोई (जि. बडोदा) परिसरात एरंडी पिकासंबंधी माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Latest Marathi News Live Update : जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याचे बदललं नाव

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT