नाशिक

सात दिवसात चौकशी अहवाल देणार

CD
सात दिवसात चौकशी अहवाल देणार कांदा खरेदी अनियमिततेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील अनियमितता व गैरव्यवहाराच्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. राज्य सरकारला सात दिवसात चौकशी अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत सन २०२६-२७ हंगामासाठी नाफेड तसेच एनसीसीएफ या नोडल संस्थांमार्फत कांदा खरेदी केली. पण, या खरेदीत अनियमितता आणि गैरप्रकार आढळून आले. याबाबत लोकप्रतिनिधी, शेतकरी व शेतकरी उत्पादक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रारी दाखल होत्या. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती गठित केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला तक्रारींच्या आधारे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना खरेदीची सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सरकारला चौकशी अहवाल सादर केले जाणार आहेत. प्रत्यक्ष तपासणी जिल्ह्यातील सर्व कांदा खरेदी केंद्र तसेच कांदा साठवणूक केंद्रांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी खुली सुनावणी घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आहे. पुढील सात दिवसात कांदा खरेदीची सखोल चौकशी पूर्ण होईल. चौकशीनंतर तातडीने राज्य सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Live Update : खूनातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; १४ साक्षीदारांच्या साक्षीवर न्यायालयाचा निर्णय

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT