Onion purchase stopped from NAFED nashik sakal
नाशिक

‘नाफेड’कडून कांदा खरेदी बंद

भाव स्थिरीकरणचे कारण : शेतकरी नाराज

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी २.५ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ‘नाफेड’च्या माध्यमातून पूर्ण केल्याचे सांगत शनिवारपासून कांद्याची खरेदी थांबविली आहे.

हाच कांदा खुल्या बाजार विक्री करण्याचे नियोजन असल्याने आधीच गडगडलेले कांद्याचे दर पुन्हा कमी होण्याच्या भीतीने शेतकरी संघटनांनी या निर्णयाविरोधा नापसंती व्यक्त केली आहे. ‘नाफेड’ने पाच लाख टनाचे उद्दिष्ट करून घ्यावे व खरेदी सुरू ठेवावी, अन्यथा ‘नाफेड’चा एकही कांदाही बाजारासाठी बाहेर पडून देणार नाही, असा इशारा दिला आहे.

खरेदी केलेल्या या ‘बफर स्टॉक’मधील कांद्याचा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पुरवठा केला जाणार आहे. भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत कांदा खरेदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे तर ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांद्याची उपलब्धता होते, असे दोन दुहेरी उद्देश साधला जात असल्याचा केंद्राचा दावा आहे. मागील महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर वाढत असल्याचे ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र या मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसताना केंद्राची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचा शेतकऱ्यांचा व शेतकरी संघटनांचा सूर आहे.

अभ्यासक व तज्ज्ञांचे मत

  • लागवड क्षेत्र वाढले, मात्र उत्पादकता कमी

  • तापमान वाढीमुळे साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता घटून सडण्याचे प्रमाण वाढले

  • सध्या अनुकूल हवामान नसल्याने कांदा अधिक टिकणार नाही

  • देशाची दैनंदिन गरज ५० हजार टन आहे त्यामुळे हा कांदा पुरेसा नाही

कांद्याचे उत्पादन प्रचंड घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळणारा सरासरी दर उत्पादन खर्चाच्या खाली आहे. त्यामुळे नाफेडने ''बफर स्टॉक'' तत्काळ खुल्या बाजारात उतरवू नये. यासाठी राज्यातील खासदार व केंद्रीय मंत्री यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

- भारत दिघोळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT