नाशिक

फाईन आर्ट अभ्यासक्रमाच्‍या सीईटी अर्जाची 25 जुलैपर्यंत मुदत

अरूण मलाणी

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना एचएएच-एएसी-सीईटी २०२१ परीक्षेसाठी २५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

नाशिक : पारंपारीक करीअरच्‍या पर्यायांच्या पलीकडे नवनवीन क्षीतीजे विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत. कला शाखेत फाईन आर्ट व डिझाईनिंग (Fine Arts course)क्षेत्रातही करीअरच्‍या व्‍यापक संधी उपलब्‍ध आहेत. या शाखेशी निगडीत बॅचलर ऑफ फाईन आर्ट (Fine Arts course) आणि बॅचलर ऑफ डिझाईन या चार वर्ष कालावधीच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना एचएएच-एएसी-सीईटी २०२१ (CET exam) परीक्षेसाठी २५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. (Online application can be filled till July 25 for the CET exam of Fine Arts course)

अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षेपेक्षा फाईन आर्ट शिक्षणक्रमाची सीईटी वेगळी असणार आहे. सध्या बहुतांश सीईटी या ऑनलाइन स्‍वरूपात (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) आहेत. परंतु फाईन आर्टच्‍या सीईटीमध्ये प्रात्‍यक्षिक परीक्षा (प्रॅक्‍टिकल एक्‍झाम) चा समावेश आहे. पात्रता व अर्ज भरतांना घ्यावयाची काळजीसह अन्‍य तपशील सूचनापत्रातून जारी केला आहे. सीईटी सेलतर्फे ही सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे पुढील कॅप राउंड प्रक्रियेच्‍या माध्यमातून प्रवेश निश्‍चित केले जातील.

प्रात्‍यक्षिक परीक्षेवर अधिक भर

पेपर क्रमांक एक हा डिझाईन प्रॅक्‍टिकल विषयाशी निगडीत असेल. पेपर क्रमांक दोन हा ऑब्जेक्‍ट ड्रॉईंग प्रॅक्‍टिकल विषयाशी निगडीत असेल. पेपर क्रमांक तीन हा मेमरी ड्रॉईंगशी निगडीत असेल. पेपर क्रमांक चार हा सामान्‍य ज्ञानावर आधारीत असेल. प्रात्‍यक्षिक परीक्षेशी निगडीत पहिले तीन पेपरकरीता प्रत्‍येकी पन्नास गुण तर पेपर क्रमांक चार करीता चाळीस गुण असतील. वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरुपाचे प्रश्‍न विचारले जातील, चुकीच्‍या उत्तराकरीता गुण कपात नसेल.

तारखेच्‍या घोळाबाबत स्‍पष्टता आणावी

माहितीपत्रकात (इन्‍फॉरमेशन ब्राऊशर) नमूद केल्‍यानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलैपर्यंत दिली आहे. तर पाचशे रुपये विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्यासाठी २६ ते ३१ जुलै दरम्‍यानची मुदत दर्शविली आहे. प्रात्‍यक्षिक परीक्षेकरीता केंद्र निवडण्याची मुदत २५ जुलै ते १ ऑगस्‍ट अशी दाखविलेली आहे. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्‍ध लिंकला भेट दिल्‍यावर संकेतस्‍थळावरील तारखांमध्ये भिन्नता आहे. या संकेतस्‍थळावर अर्जाची मुदत २८ जुलैपर्यंत दाखविली आहे. विलंब शुल्‍कासह अर्जाची मुदत २९ जुलै ते ४ ऑगस्‍ट अशी दाखविली आहे. त्यामुळे तारखेच्‍या घोळाबाबत सीईटी सेलने स्‍पष्टता आणण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT