धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंद सुरू
-
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी; तांत्रिक अडणींचा सामना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पंधरा ऑक्टोबरपासून पहिली ते बारावीच्या शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. ‘स्विफ्ट चॅट’द्वारे ही नोंद केली जात आहे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी बारा, अन्य शाळांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच, तर रात्रशाळांसाठी रात्री नऊपर्यंत उपस्थिती नोंदविण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी ही सूचना जारी केली आहे.
-
राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष वेळेत नोंदविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन उपस्थितीनंतर आता शिक्षकांची उपस्थितीही नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापकांनी ही नोंद करावी. त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी मुख्याध्यापकांनी ती करणे अनिवार्य आहे.
-
नोंदीबाबत सूचना
शालार्थ संकेतस्थळावर नोंद असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थिती नोंदविताना शाळेचा यू-डायस क्रमांक, स्वतःचा शालार्थ क्रमांक आणि शालार्थवर नोंदविलेला मोबाईल क्रमांक वापरावा. मोबाईल क्रमांक बदलल्यास तो शालार्थ संकेतस्थळावर अद्ययावत करावा. शालार्थवर नोंद नसलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यू-डायस प्लसमधील दहा अंकी राष्ट्रीय शिक्षक संकेतांक आणि यू-डायसवर नोंदविलेला मोबाइल क्रमांक वापरावा.
-
समन्वयक नियुक्त
ऑनलाइन उपस्थिती नोंदविताना अडचणी आल्यास या दुव्यावर https://tinyurl.com/AttendanceBot त्यांची नोंद करता येईल. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षण आणि महापालिका स्तरावरील समकक्ष अधिकारी जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थिती नोंदींचा नियमित आढावा घेतील.
-
१४-१
...चौकट...
१४-१
तांत्रिक अडचणींमुळे संभ्रम
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांना ‘स्विफ्ट चॅट’संबंधी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात एकाच शिक्षकाचे शालार्थ आयडी आणि यू-डायस क्रमांकानुसार दोन नावे दिसत आहेत. त्यामुळे नेमक्या कुठल्या क्रमांकाला उपस्थिती दाखवावी, असा संभ्रम संबंधितांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यांनी नियुक्त समन्वयक अधिकाऱ्यांकडे याप्रश्नी तक्रारही केली आहे. तिचे निवारण लवकर होते किंवा कसे याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.