नाशिक

मुक्‍त विद्यापीठाचा ‘सुपरमाईंड’सोबत सामंजस्य करार

CD
मुक्‍त विद्यापीठाचा ‘सुपरमाईंड’सोबत सामंजस्य करार ऑनलाइन ‘शैक्षणिक संशोधन’ पदविका शिक्षणक्रमाची मिळणार संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१० : अध्यापनातील समस्या समजून घेऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने उपाय शोधता यावेत, तसेच शिक्षकांच्या संशोधन कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठ आणि पुण्यातील ‘सुपरमाईंड’ या शैक्षणिक संस्थेदरम्यान ऑनलाइन ‘शैक्षणिक संशोधन’ पदविका शिक्षणक्रमाच्या विकास व अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या एक वर्षाच्या पदविका शिक्षणक्रमातून संशोधन पद्धती, माहिती संकलन, विश्लेषण आणि अहवाल लेखनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठी भाषेतून ऑनलाइन व स्वयंअध्ययन पद्धतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. कोणत्याही शाखेतील पदवीधरांना प्रवेश घेता येणार असून, ग्रामीण आणि प्राथमिक शिक्षकांना त्याचा विशेष लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी, अध्यापन पद्धतींची परिणामकारकता आणि अध्ययन निष्पत्ती यांचा अभ्यास करून शिक्षकांना स्वतःच्या अध्यापनात सुधारणा करता येईल. वर्गातील अनुभवांना संशोधनाची जोड देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कराराप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव सुरेंद्र पाटोळे, डॉ. मधुकर शेवाळे, प्रा. गणेश लोखंडे, डॉ. अमोल शिरफुले, सुपरमाईंडच्या संचालिका मंजूषा वैद्य, डॉ. प्राची साठे, अश्विनी भालेकर आणि डॉ. विद्या अहिरे उपस्थित होते. कोट राज्यात प्रयोगशील शिक्षकांची संख्या मोठी आहे. अध्यापनातील समस्या सोडवून विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. या प्रयत्नांना शास्त्रीय संशोधनाची जोड मिळावी, यासाठी हा शिक्षणक्रम सुरू केला आहे. शिक्षकांनी यात प्रवेश घेऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यास हातभार लावावा. - प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT