police maha.jpg
police maha.jpg 
नाशिक

पोलिसाला ऑनलाइन गंडा! बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फसवणूक

विनोद बेदरकर

नाशिक : संदीप कऱ्हे शहर पोलिस दलात कार्यरत असून, ते आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. पण भामट्याच्या जाळ्यात अडकून त्यांना चांगलाच गंडा घातला आहे.

पोलिसाला ऑनलाइन गंडा
संदीप कऱ्हे शहर पोलिस दलात कार्यरत असून, ते आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. २८ जानेवारीला सायंकाळी भामट्याने (८३०३७९३०४६) या क्रमांकावरून संपर्क साधून कार्डचे लिमिट वाढविण्याबाबत विचारपूस केली. कऱ्हे यांनी क्रेडिट वाढची पसंती दर्शविली असता, ही घटना घडली. कार्डची गोपनीय माहिती आणि ओटीपी नंबर मिळवून भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवर पासकर टेक्नॉलॉजी या कंपनीतून सुमारे ७९ हजार १४ रुपयांची खरेदी केली. ही बाब लक्षात येताच कऱ्हे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत. 

आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून भामट्याने क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा वाढवून देण्याची बतावणी करीत पोलिसाच्या क्रेडिट कार्डवरून ८० हजारांची परस्पर खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संदीप श्रावण कऱ्हे (रा. स्नेहबंधन पार्क, पोलिस वसाहत) यांच्या तक्रारीवरून फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT