otp fraud esakal
नाशिक

ओटीपी शेअर न करताही ऑनलाईन गंडा? बँकांसह ग्राहकांनाही धक्का

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : बँकेशी संलग्न मोबाईलवर (mobile) आलेला ओटीपी (otp) शेअर न करताही एका कंपनी कामगाराला भामट्यांनी तब्बल ३५ हजारांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला. या प्रकारामुळे बँकांसह ग्राहकांनादेखील धक्का बसला आहे.

असा घातला गंडा...

सिडकोच्या उपेंद्रनगरात राहणार्‍या चंद्रभान राक्षे हे अंबड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामगार आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी 8260163158 या क्रमांकावरुन फोन आला होता. समोरील व्यक्तीने त्यांना आपण गूगल पे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांना 9861451213 या क्रमांकावरुन एसएमएस आला. त्यात https://www.surveymonkey.com/r/S5KDV82 ही लिंक देण्यात आलेली होती. फोनवरील हिंदी भाषिक व्यक्तीने राक्षे यांना त्यांच्या तक्रारीसाठी लिंकवर क्लिक करुन अर्ज भरण्यास सांगितले. आर्थिक व्यवहारासंबंधित तक्रार आधीच प्रलंबित असल्याने, आलेल्या फोनवर विश्वास ठेवत राक्षे यांनी एसएमएम मधील लिंकवर क्लिक केले आणि त्यापुढे स्वतःच्या नावासह बँकेचे डिटेल्सदेखील टाकले. शेवटच्या टप्प्यात त्या लिंकद्वारे ओपन झालेल्या वेबसाईटवर ओटीपी विचारण्यात आला. मात्र, राक्षे यांना फसवणुकीबाबत माहित असल्याने त्यांनी ओटीपी दिला नाही. मात्र, याचवेळी त्यांना २५ हजार रुपये बँकेतून गेल्याचा मेसेज आला.

ओटीपी शेअर न करताही एवढी मोठी रक्कम गेल्याचे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने फोन बंद केला. या प्रकारामुळे बँकांसह ग्राहकांनादेखील आता केवळ ओटीपीच नव्हे तर मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT