Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ऑनलाइन लिंक आली, क्लिक करू नका! गंडा घालण्याच्या प्रकारात होतेय वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : ऑनलाइन जॉबच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असतात.

आता तर नामांकित दर्जाच्या कंपन्यांच्या नावे बनावट ॲप व लिंक तयार करून सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार केली आहे. अशा लिंकबाबत सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू केला आहे. (Online Link fraud increase cyber crime nashik)

सणासुदीचा काळ सुरू असल्याने या काळात नामांकित ई-कॉमर्स साईट्सवरून खरेदी केली जाते. त्यामुळे सायबर भामट्यांनी अनोखा फंडा सुरू करीत, बनावट ॲप व लिंकच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे.

हैदराबादमधून एका क्रमांकाद्वारे व्हॉटसॲपवर नामांकित ई-कॉमर्स कंपनीच्या नावे लिंक पाठवून, त्या अॅपद्वारे गुंतवणूक केल्यास १८० दिवसांत १२५ रुपये रोज नफा या दराने परतावा मिळेल, असे सायबर भामट्यांकहून आमिष दाखविले जाते.

त्यानुसार एक व्हॉटसॲप ग्रुपही तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नाशिकच्या २०-२५ जणांसह इतर २५० सदस्य होते. त्यातील प्रत्येकाने लिंक व ॲपद्वारे ५० हजारांपासून दीड लाखांपर्यंत गुंतवणूक केली.

संशयितांकडून सुरुवातीला ५ हजार रुपये परतावाही आला. मात्र, गणेशोत्सवाला सुरवात होण्यापूर्वी ही लिंक व ॲपने काम करणे बंद झाले आहे. यामुळे नाशिकमधील जे काम करीत होते, त्यांना लाखोंची फसवणूक झाली असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

रविवारी (ता.२४) फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी नाशिक सायबर पोलिस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देत लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. यानुसार ५० हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर भामट्यांकडून सदरची लिंक व ॲप बंद केली जाते.

देशभरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांनी याबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सायबर पोलिसांनी तातडीने तक्रार अर्जाचा तपास सुरू केला आहे.

"बनावट ॲप व लिंकद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्यासंदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे."- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

"तो माजोरडा आहे" सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले "माझी भाषा अशीच आहे"

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

SCROLL FOR NEXT