Online Admission Sakal
नाशिक

11th Admission : ग्रामीणमधील मविप्र महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

11th Admission : मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या नाशिक महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते आहे.

त्‍यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करत मेरीट फॉर्म भरायचा आहे. संस्‍थेतर्फे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केलेल्‍या आहेत. (Online Process for 11th Admission in MVP College in Rural area nashik news)

मविप्र संस्‍थेच्‍या ग्रामीणमधील महाविद्यालयात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान, आणि उच्च माध्यमिक व्यावसायीक अभ्यासक्रम ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. नाशिक महापालिका क्षेत्र वगळता अन्‍य क्षेत्रांसाठी ही प्रक्रिया आहे.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.online.mvp.edu.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेरिट फॉर्म भरावयाचा आहे. मेरिट फॉर्म आपल्याला हव्या असलेल्या मविप्र संस्थेचा कनिष्ठ महाविद्यालयांच्या नावाने भरता येईल.

प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एआरसी सेंटरला जाऊन विद्यार्थी नाममात्र शुल्क भरून आपला मेरीट फॉर्म भरून घेऊ शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मेरीट फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तो अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. सबमिट केलेल्या मेरिट फॉर्मची प्रिंट करून एक प्रत कनिष्ठ महाविद्यालयीन पडताळणीसाठी, पसंती क्रमांक दिलेल्या कोणत्याही एका मविप्रच्या कनिष्ठ महाविद्यालयीन एआरसी सेंटरमध्ये जमा करावी.

त्यावेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी. त्यावर कनिष्ठ महाविद्यालयीन एआरसी समितीतील सदस्यांची सही व शिक्का घेऊन सदर प्रत पुढील प्रक्रियेसाठी जपून ठेवावी. मेरीट फॉर्म पडताळणी व जमा करण्याची मुदत १४ जूनच्‍या दुपारी दोनपर्यंत असणार आहे.

पडताळणी न केलेले विद्यार्थी गुणवत्ता यादीसाठी पात्र राहणार नाहीत. प्रवेशाशी निगडित अन्‍य सूचना संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असून, विद्यार्थ्यांनी सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे, असे आवाहन संस्‍थेतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT