Cyber Crime News esakal
नाशिक

Nashik Cyber Crime : Online Appच्या दामदुपटीचे आमिष दाखवून ऑनलाइन गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून भामट्याने एकाला दीड लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक ओमप्रकाश सिंग (रा. मोरवाडी, सिडको) या युवकाच्या फिर्यादीनुसार, गो ॲन्ड शॉप लाइफ या लिंकवर त्याने क्लिक केले. त्यानंतर त्यावर त्याने आयडी व पासवर्ड तयार केला असता, गोशॉप ६६ असा कस्टमर केअर टेलिग्राम आयडी मिळाला. ऑनलाइन भामट्याने विवेकला संपर्क साधून ॲपची माहिती दिली आणि त्यासाठीच्या एकूण ३० स्टेप्स सांगितल्या. (Online scam by luring Money Doubling through Online App Nashik Cyber ​​Crime news)

प्रत्येक स्टेपला भरलेले पैसे दुप्पट होतील. तसेच त्यावर मिळालेले वेगवेगळे कमिशन ॲपच्या वॉलेटमध्ये जमा होतील. जमा झालेली रक्कम आपल्याला कधीही काढता येते असेही सांगण्यात आले. त्यानुसार, विवेक याने ॲपच्या एक-एक स्टेप्स पूर्ण करत गेला असता, त्याच्या ॲक्सिस, आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेच्या खात्यातून गुगल पे आणि फोन पेवरून १ लाख ५८ हजार रुपये भरले. मात्र याबाबत विवेकला शंका आल्याने त्याने ॲपच्या वॉलेटमधून पैसे परत आपल्या बँक खात्यावर टाकण्याचा प्रयत्न केला असता तसे झाले नाही.

त्यामुळे विवेक याने टेलीग्रामच्या कस्टमर केअर आयडीवर संपर्क साधून पैसे परत मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावेळी ऑनलाइन भामट्याने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने अंबड पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, अंबड पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT