(संबंधित स्केच वापरता येईल)
---
‘इन्स्टाग्राम’वर कपड्यांची ऑनलाइन खरेदी पडली महाग
जळगावच्या गृहिणीला ८७ हजारांचा गंडा; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : सोशल मीडियावरून कपड्यांची जाहिरात पाहून ऑनलाइन ऑर्डर देणे जळगाव शहरातील एका गृहिणीला महागात पडले आहे. कपड्यांची ऑर्डर आणि डिलिव्हरीच्या नावाखाली सायबर ठगबाजांनी गृहिणीच्या बँक खात्यातून तब्बल ८७ हजार २१९ रुपये उकळून ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महावीर नगरातील सरजू निवास (विकास दूध फेडरेशनजवळ) येथे राहणाऱ्या प्रीती मुकेश बांगड (वय ४१) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ''लक्ष्मी कलेक्शन'' (रा. गौरव पथ रोड, शास्त्री नगर, जोधपूर, राजस्थान) नावाच्या अकाउंटवर कपड्यांची ऑर्डर दिली होती.
सामान ग्लोबल डिलिव्हरी डिपार्टमेंटतर्फे घरपोच पाठवले जाईल, असा विश्वास संशयितांनी त्यांना दाखवला. त्यानंतर २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप कॉलवरून संपर्क साधून कपड्यांचे पेमेंट आणि डिलिव्हरीच्या नावाखाली वेगवेगळ्या क्यूआर कोड लिंक्स पाठविल्या.
चौकट
लिंक क्लिक करताच रक्कम गायब
संशयितांनी प्रीती बांगड यांना बँक ऑफ इंडियाच्या काही बनावट लिंक्स पाठवून त्या उघडण्यास सांगितल्या. तसेच त्यांनी दिलेले काही कोड टाकण्यास सांगितले. गृहिणीने यावर विश्वास ठेवून प्रक्रिया पूर्ण करताच, त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण ८७ हजार २१९ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. पैसे जाऊनही कपड्यांची कोणतीही डिलिव्हरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रीती बांगड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सागर शिंपी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.