Booster Dose esakal
नाशिक

नाशिक : बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण अवघे 10 टक्के

सप्टेंबर अखेरपर्यंत अमृत महोत्सवानिमित्त मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक दोन डोस (Vaccination) घेतल्यानंतर अधिक सुरक्षिततेसाठी तिसरा अर्थात बूस्टर डोस घेण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिल्या असल्या तरी नाशिकमध्ये मात्र बूस्टर डोस (Booster dose) घेण्याचे प्रमाण अवघे दहा टक्के आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत अमृत महोत्सवानिमित्त मोफत बूस्टर डोस दिला जाणार असल्याने नागरिकांनी डोस घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

नाशिक महापालिका हद्दीमध्ये १३ लाख २६ हजार नागरिकांनी पहिला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला आहे. हे प्रमाण लोकसंख्येच्या ९६ टक्के आहे. दहा लाख ६५ हजार नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण ७८ टक्के आहे. एक लाख ४० हजार ३४८ नागरिकांनी तिसरा अर्थात बूस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण लोकसंख्येच्या एकूण दहा टक्के आहे. एकंदरीत बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण अत्यल्प असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून चौथी लाट आल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पंधरा ते अठरा वयोगटासाठी ९०३८३ लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ६२ हजार ६०४ जणांना पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर ४४ हजार ७१३ मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वयोगटासाठी ५८ हजार ४५० मुलांचे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यातील ४८,४१९ मुलांनी पहिला डोस घेतला, तर ३६ हजार ५८७ मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी तिसरा बूस्टर डोस घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो हिंसाचार...

Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

SCROLL FOR NEXT