Black Spots latest marathi news esakal
नाशिक

Nashik : 2 महिन्यात अवघे 18 Black Spot बंद

विक्रांत मते

नाशिक : स्वच्छ भारत अभियानाच्या (Swachh Bharat Abhiyaan) पार्श्वभूमीवर शहरातील ५४ कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट (Black Spot) बंद करण्याच्या सूचना देऊनही दोन महिन्यात अवघ्या १८ ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव अद्यापही लालफितीत अडकला आहे. (Only 18 Black Spot closed in 2 months Nashik Latest Marathi news)

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये क्रमांक मिळवण्यासाठी महापालिकेची चार वर्षांपासून धडपड सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानात कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे नियोजन होते.

आरोग्य विभागाला दिलेल्या निर्देशानुसार शहरात कचऱ्याचे ५४ ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. ब्लॅक स्पॉट बंद करण्याबरोबरच त्या जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जेणेकरून कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करणे प्रशासनाला सोपे जाईल.

सीसीटीव्हीचा प्रस्ताव स्मार्टसिटीकडे सादर करूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, ५४ ब्लॅक स्पॉट पैकी अवघे १८ ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. उर्वरित ३८ ठिकाणी अद्यापही उघड्यावर कचरा टाकला जात असून, स्वच्छ भारत अभियानापुरती स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याची चर्चा आहे.

सिडको ब्लॅक स्पॉट मुक्त

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको व सातपूर या विभागात दोन प्रकार दिसून आले. सिडको विभागात एकही ब्लॅक स्पॉट नाही, तर सातपूर विभागात १८ कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळले.

यातील पाच ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले, तर अद्यापही १३ शिल्लक आहे. पश्चिम विभागात चार कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट होते. तेथे एकही बंद करण्यात आले नाही. पंचवटी विभागात १६ पैकी चार ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले.

नाशिक रोड विभागात कचऱ्याचा अवघा एकच ब्लॅक स्पॉट होता. तोही बंद करण्यात आला. पूर्व विभागात १५ पैकी नऊ ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले. सिडकोत एकही कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट नसल्याने कचराकुंडी मुक्त सिडको विभाग असल्याचे दिसून आले. ५४ पैकी १८ ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले तर ३८ कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट अद्यापही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT