nashik smart city esakal
नाशिक

नाशिक : स्मार्टसिटीची २२ पैकी फक्त ८ काम पूर्ण; वर्षभर चालणार काम

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक महापालिकेच्या (nmc) स्मार्टसिटी कंपनीची अद्याप बरीच काम बाकी असल्याने आणखी साधारण जून २०२३ पर्यंत तरी कंपनीची काम चालणार आहे. कंपनीच्या एकूण साडेआठशे कोटीच्या कामापैकी जेमतेम ८ काम पूर्ण झालेली असल्याने एकूणच साडे ८०० कोटीच्या कामांसाठी पुढील वर्षाचा कालावधी महत्त्वाचा असणार आहे.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारच्या संकल्पनेतून देशात स्मार्टसिटी संकल्पना राबविण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचा काही टक्के हिस्सा घेऊन त्यात केंद्र शासनाच्या मदत निधीतून स्वतंत्र कंपनीच्या स्वरूपात स्मार्टसिटी ही संकल्पना राबविण्यात आली. याअंतर्गत एकंदर २२ कामे प्रस्तावित आहेत. आतापर्यंत 22 कामांपैकी स्मार्ट रस्त्यासह एकंदर ८ कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात कालिदास कलादालनाचे नूतनीकरण, महात्मा फुले कलादालन, विद्युत शववाहिका, पंडित पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण अशी काही मोजकी कामे पूर्णत्वास आली आहे, तर अनेक रस्त्यांची कामे नागरिकांच्या तक्रारी आणि संथ कामकाजामुळे चर्चेत आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या या संकल्पनेत ठराविक दिवसानंतर आणि स्मार्टसिटी कंपनीच्या उद्देशपूर्तीनंतर संबंधित कंपन्या त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थात विलीन करण्याचे प्रस्तावित असले तरी, नाशिकला मात्र किमान वर्षभर तरी स्मार्ट सिटीचे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. बहुतांश कामांसाठी स्मार्टसिटीतर्फे २४ ते ३० महिन्यांचा कालावधी निश्चित केलेला आहे. तसेच, केंद्र शासनाने यापूर्वीच स्मार्टसिटी कंपनीला जून २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने आणखी वर्षभर तरी स्मार्टसिटीची कामे सुरूच राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT