Application form esakal
नाशिक

Nashik News: मुक्‍त विद्यालय मंडळाच्‍या परीक्षा अर्जाची रविवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुक्‍त विद्यालय मंडळाच्‍या पाचवी आणि आठवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे यासंदर्भात सूचना जारी करताना रविवार (ता. १५)पर्यंत मुदत वाढविल्‍याचे जाहीर केले आहे. (Open School Board Exam Application Deadline till Sunday Nashik News)

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबारचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागीय मंडळाच्‍या कार्यक्षेत्रातील केंद्र शाळाप्रमुख व मुख्याध्यापकांना सूचना कळविली आहे.

महाराष्ट्र राज्‍य मुक्‍त विद्यालय मंडळामार्फत घेतल्‍या जाणाऱ्या प्राथमिक स्‍तर (पाचवी) आणि उच्च प्राथमिक स्‍तर (आठवी) परीक्षेसाठी नव्‍याने प्रविष्ट होणाऱ्या व नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या मूल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी रविवार (ता. १५) पर्यंत वाढीव मुदत राहील.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणीची मुदत वाढविताना इतर वेळापत्रकातही सुधारणा केली आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्‍क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्‍या संपर्क केंद्र शाळेत जमा करण्यासाठी १८ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्‍क व मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करण्यासाठी २३ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT