नाशिक

जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’

CD
NSK26H35183 जळगाव : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये आढळलेल्या संशयितांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. --- ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त --- एकाच रात्री जिल्हाभर पोलिसांची धडक कारवाई; हातभट्टी दारू, जुगाराविरोधात मोहीम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता १६ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंद्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस दलातर्फे सोमवारी (ता. १६) पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहीम राबविण्यात आली. अवैध दारू, जुगार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, विनाहेल्मेट वाहन चालविणारे, फरारी संशयित, तडिपार गुन्हेगारांची तपासणी, तसेच समन्स व वॉरंट बजावणी करण्यात आली. भंगार दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल व लॉजची तपासणी करून सीईआयआर पोर्टलद्वारे चोरीचे मोबाईल शोधण्यात आले. अवैध गावठी हातभट्टी दारूविरुद्ध १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५,७२५ लिटर गावठी दारू आणि २८ हजार १७२ लिटर रसायन जप्त व नष्ट करण्यात आले. या प्रकरणी १२ संशयितांवर कारवाई करत २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी व विदेशी दारूची अवैध विक्री प्रकरणी १२ गुन्हे दाखल, देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा ६१ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त. जुगार कारवाई : ८६ गुन्हे दाखल, ६० संशयितांवर कारवाई. १९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त. शस्त्र कारवाई : २ तलवारी जप्त. मोटर वाहन कायदा : मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ७७ जण, विनाहेल्मेट १३३, अनधिकृत पार्किंग ६१ जणांवर कारवाई. एकूण ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांची दंडात्मक वसुली. हरवलेली व्यक्ती शोध : मोहिमेत एकूण १७ जणांचा (महिला-५, पुरुष-७, मुली-५) शोध लावण्यात आला. अंमली पदार्थ (एनडीपीएस) कारवाई : ११ गुन्हे दाखल (ज्यात १० अंमली पदार्थ सेवन केस समाविष्ट आहेत) ३.२५० किलो ग्रॅम गांजा आणि एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. समन्स व वॉरंट बजावणी : ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. सराईत गुन्हेगार व तडीपार : ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून ११ जणांवर प्रतिबंधक कारवाई, तसेच ८ हद्दपारांवर कारवाई. मोबाईल रिकव्हरी : चोरीस गेलेले किंवा हरवलेले ४२ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. एकूण १८० हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी व त्यांच्या पथकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड आरटीओच्या रडार यंत्रणेमुळे सात महिन्यांत १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई; ८९ कोटींहून अधिक दंड आकारला

Congress: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून स्क्रीनिंग कमिट्या जाहीर; उत्तर प्रदेशची जबाबदारी 'या' नेत्याकडे

MLA Shankar Mandekar : मुळशी तालुक्यात नव्याने पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश; आमदार मांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Kalbhor Nagar : काळभोरनगरमधील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरात दोन वर्षांपासून सिमेंटचा धुरळा आणि रासायनिक दुर्गंधीचा त्रास; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pune Airport : प्रवाशांची वाट पाहण्यासाठी टर्मिनलवर थांबणाऱ्या वाहनांवर विमानतळ प्रशासनाची नजर; एनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वेळेची नोंद होणार

SCROLL FOR NEXT