pande cp  e-sakal
नाशिक

आशादायक! गुन्हेगारी सोडू इच्छिणाऱ्यांना पोलिसांकडुन संधी

विनोद बेदरकर

गुन्ह्यांच्या प्रतिबंधासोबतच गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडविणे हेही पोलिसांचे उद्दिष्ट असावे, याच नियमावलीनुसार पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये गुन्हेगार सुधार कार्यक्रम राबविला जाणार आहे

नाशिक : नाशिक शहर पोलिस (nashik city police) आयुक्तालयातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रतिबंधात्मक कारवाई केल्या. दहा वर्षांतील विक्रमी हद्दपारी, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केल्या आहेत. आता पोलिस गुन्हेगारांना गुन्हेगारी (crime) क्षेत्र सोडण्याची संधी देणार आहेत. (Opportunity for criminals from the police to quit crime)

दहा वर्षांत विक्रमी हद्दपारी

भावनेच्या भरात, अनावधानाने व अजाणतेपणे ज्यांचा गुन्हेगारीत सहभाग आला आहे. मात्र, त्यांना गुन्हेगारी मार्ग सोडून समाजात सामान्य जीवन जगायचे आहे, अशांचा गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीचा आढावा घेतला जात आहे. त्या अंतर्गत सोमवारी दुपारी चारला शहर पोलिस आयुक्तालयातील चारही विभागांत एकाचवेळी मेळावे होणार आहेत. गुन्ह्यांच्या प्रतिबंधासोबतच गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडविणे हेही पोलिसांचे उद्दिष्ट असावे, याच नियमावलीनुसार पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये सोमवारी (ता.२१) गुन्हेगार सुधार कार्यक्रम राबविला जाणार आहे. याबाबत पोलिस आयुक्तांनी रविवारी (ता. २०) आदेश काढले.

रोजगाराचे मार्गदर्शन

गुन्हेगार सुधार मेळाव्यात मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ पोलिस आधिकारी संशयितांचे समुपदेशन करणार आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, काम व व्यवसायाची माहिती घेणार आहेत. याशिवाय त्यांना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. दर तीन महिन्यांनी असे गुन्हेगार सुधार मेळावे होणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, दीपाली खन्ना, सोहेल शेख, समीर शेख आदी मेळावा यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत.

''जे गुन्हेगार, संशयित चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र देतील, अशांना समाजातील जबाबदार घटक होण्यासाठी सुधारण्याची संधी म्हणून ‘गुन्हेगार सुधार योजना’ राबविली जाणार आहे. भावनेच्या भरात, अजाणतेपणी गुन्हेगार शिक्का बसलेल्यांना सुधारण्यास वाव आहे.'' -दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक

(Opportunity for criminals from the police to quit crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT