tax  Google
नाशिक

सामान्य नागरिकांनादेखील घरपट्टी माफीची अपेक्षा

युनूस शेख

जुने नाशिक : मंगल कार्यालय, लॉन्सची घरपट्टी माफी केली जात आहे. तर मग सामान्य नागरिकांची का नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम सामान्यांवर झाला आहे. आजही त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. याचा विचार करता सामान्यांची घरपट्टी माफी केली तर त्यांना मोठा आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

नागरिक दीड वर्षापासून कोरोना संकटास तोंड देत हलाखीचे जीवन जगत आहेत. लॉकडाउनमुळे सर्वांचेच व्यवसाय बंद पडले आहे. मंगल कार्यालय, लॉन्सचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. सामान्यांचा विचार केला तर त्यांचे नुकसान काहीशी कमी आहे. मंगल कार्यालय, लॉन्स यांच्यातील सोहळे चालू झाल्यावर एक किंवा दोन सोहळ्याच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेतून त्यांची घरपट्टी भरण्यास चालकांना मदत होऊ शकते. सामान्यांचे मात्र तसे नाही. काही प्रमाणात व्यवहार जरी सुरू झाले असले तरी हव्या त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दैनंदिन मिळणाऱ्या उत्पन्नातून रोजचा खर्च कसाबसा भागविला जात आहे. अशा वेळेस त्यांच्याकडून घरपट्टी भरणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या संकटाचा विचार करता त्यांची घरपट्टी माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काँग्रेस सेवादलाचे निवेदन

लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम लहान-मोठे व्यवसायावर झाला आहे. याच व्यवसायावर सामान्यांचे जीवन अवलंबून आहे. व्यवसायात बंद असल्याने त्यांचे अर्थ व चक्र पूर्णपणे थांबले आहे. ज्या पद्धतीने मंगल कार्यालय, लॉन्स यांना घरपट्टी माफ करण्याचा विचार केला आहे. त्याच पद्धतीने सामान्यांची घरपट्टी माफ करण्याची मागणी नाशिक काँग्रेस सेवादलातर्फे करण्यात आली आहे.

सलूनसारखा छोटा व्यवसाय करीत आहे. लॉकडॉउनमुळे व्यवसायदेखील बंद करण्याची वेळ आली होती. अशा वेळेस काटकसरीने जीवन जगावे लागत आहे. महापालिकेने घरपट्टी माफीचा विचार केला तर काहीसा दिलासा मिळेल.

- बापू सूर्यवंशी, नागरिक

मंगल कार्यालय लॉन्स यांची घरपट्टी माफी केली जात आहे. मग सामान्य नागरिकांशी महापालिका का थट्टा करत आहे. त्यांची देखील घरपट्टी माफी करत त्यांना दिलासा देण्यात यावा.

- वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवादल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Chikhaldara Accident: सेल्फी घेताना तोल गेला अन् दरीत कोसळले; चिखलदऱ्यात बार्शीटाकळीतील ४० वर्षीय युवकाचा मृत्यू, मित्रांसोबत फिरायला गेले अन्..

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT