Organ Donation sakal
नाशिक

Organ Donation : मरावे परी अवयव कीर्तिरूपी उरावे...! अवयवदानाची चळवळ होतेय वृद्धिंगत

मरावे परी अवयव कीर्तिरूपी उरावे...! अवयवदानाची चळवळ होतेय वृद्धिंगत

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा


नाशिक : विविध कारणांनी अवयव निकामी झाल्‍याने अनेक रुग्‍णांना डायलिसिस व यांसारखे क्‍लिष्ट उपचार घ्यावे लागतात. अवयव प्रत्‍यारोपणातून अशा रुग्‍णांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते. मेंदूमृत व्यक्‍तींच्‍या पश्‍चात त्‍यांच्‍या नातेवाइकांनी घेतलेल्‍या अवयवदानाच्‍या निर्णयातून अशाच प्रकारे अनेक रुग्‍णांना नवजीवन प्राप्त होतेय. या वर्षी २०२२ मध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश असलेल्‍या झेडटीसीसी, पुणे अंतर्गत ४२ अवयवदान करण्यात आले असून, वर्षाकाठी हा आकडा पन्नासपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. आणखी व्‍यापक स्वरूपात जनजागृती करत हा आकडा तीन आकड्यांपर्यंत नेण्याची आवश्‍यकता आहे.


बदललेली जीवनशैली, खाण्या-पिण्याच्‍या सवयींपासून अन्‍य विविध कारणांनी मूत्रपिंड, यकृत, हृदय आदी अवयवांची कार्यक्षमता प्रभावित होत असते. अशा रुग्‍णांना क्‍लिष्ट स्वरूपाचे उपचार घ्यावे लागतात. परंतु यावर उपाय म्‍हणून निकामी झालेल्या अवयवांचे प्रत्‍यारोपण केले जाते. मूत्रपिंड, यकृताबाबत अनेकदा रक्‍ताच्‍या नात्‍यातील व्‍यक्‍तींनी केलेल्‍या दानातून रुग्‍णाला जीवदान मिळत असते. परंतु याविषयी असलेले अनेक गैरसमज व भीतीमुळे अद्यापही अशा प्रकारच्‍या अवयवदानाचे प्रमाण कमीच आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दुसरा पर्याय म्‍हणजे वैद्यकीयदृष्ट्या एखाद्या व्‍यक्‍तीस मेंदूमृत घोषित केले, तर अशा व्‍यक्‍तींच्‍या नातेवाइकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय आठ ते नऊ रुग्‍णांच्‍या जीवनात आशेचा किरण निर्माण करू शकते. वैद्यकीय क्षेत्रातून याबाबत जनजागृती केली जात असून, अवयवदानाच्‍या प्रमाणात सौम्‍य गतीने का होईना; परंतु वाढ होत असल्‍याची दिलासादायक बाब आहे.


ग्रीन कॉरिडोअरचा आधार
नाशिकहून अनेकवेळा पुण्यापासून तर कोल्‍हापूरपर्यंत प्रत्‍यारोपणासाठी अवयव नेण्यात आले आहेत, यासाठी ग्रीन कॉरिडोअरचा आधार घेतला जातो. याअंतर्गत प्रत्‍यारोपणासाठी अवयव नेणाऱ्या रुग्‍णवाहिकेचे नेतृत्‍व पोलिस दलातील वाहन करताना, रस्‍त्‍यात वाहतूक किंवा अन्‍य कुठलाही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. यातून निर्धारित वेळेत अवयव प्रत्‍यारोपणासाठी उपलब्‍ध करण्याचे आव्‍हान यशस्वी‍रीत्‍या पेलले जात आहे.

प्रत्‍येक मिनिट महत्त्वाचा..
रुग्‍णाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर वैद्यकीय पथक अशा व्‍यक्‍तीची वैद्यकीय तपासणी करते. प्रत्‍यारोपणायोग्‍य अवयव असल्‍यास ते काढून गरजू रुग्‍णांची प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्यापर्यंत प्रत्‍येक मिनिट महत्त्वाचा असतो. निर्धारित वेळेत अवयव प्रत्‍यारोपित झाले नाही, तर अशी शस्‍त्रक्रिया अपयशी होऊ शकते.

झेटीसीसी, पुणेअंतर्गत वर्षनिहाय झालेले अवयव प्रत्‍यारोपण
२०१८------------------------६३
२०१९------------------------६३
२०२०------------------------४१
२०२१------------------------४४
२०२२ (नोव्‍हेंबरपर्यंत)------४२

२०२२ मध्ये झालेल्‍या अवयवदानाचा तपशील असा-
मूत्रपिंड--------------६७
यकृत----------------३७
हृदय-----------------७
फुफ्फुस (पेअर)-------५
स्‍वादूपिंड----------१

अवयवदानाच्‍या प्रतीक्षेची स्‍थिती-
(२४ नोव्‍हेंबरपर्यंत)
मूत्रपिंड--------------एक हजार ५९३
यकृत----------------८७०
हृदय-----------------७०
मूत्रपिंड-यकृत-------२८
मूत्रपिंड-स्वादूपिंड---३९

''गेल्‍या काही वर्षांमध्ये वाढत्‍या जनजागृतीमुळे अवयवदानाचे प्रमाण वाढत आहे. प्रतीक्षा यादीतील रुग्‍णांची संख्या लक्षात घेता आणखी व्‍यापक जनजागृती होण्याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी आम्‍ही क्‍यूआरकोड स्‍कॅन करत अवयवदानाचा संकल्‍प अर्ज भरण्याची सुविधा उपलब्‍ध केली आहे. प्रत्‍येक नागरिकाने अवयवदानाच संकल्‍प करताना सामाजिक बांधिलकी जोपासावी.'' - आरती गोखले, मुख्य समन्‍वयक, झेडटीसीसी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT