historical Barav in otur esakal
नाशिक

Nashik : ओतुरची ऐतिहासिक बारव पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

राजेंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्‍वभूमी (Historical background) लाभलेल्या व धोडप किल्ल्याच्या (Dhodap Fort) पायथ्याशी असलेल्या ओतूर गावातील ऐतिहासिक बारव (Well) पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत आहे. आजही इतिहासप्रेमींचे लक्ष ही बारव वेधून घेते. (Oturs historic Barwa awaits revival Department of Archeology Nashik News)

ओतूर येथील बारव कोणत्या काळात बांधली गेली, याचे कोणतेही कागदोपत्री पुरावे अथवा शिलालेख उपलब्ध होत नसले तरी ही बारव होळकर धाटणीची नंदा प्रकारातील बारव असल्याचे सांगितले जाते. ही बारव आज जरी सुस्थितीत असली तरी अस्वच्छता आणि काही भाग पडझडीच्या वाटेवर असल्याने पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष देऊन या बारवेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.

"ओतूर येथील ऐतिहासीक बारव इतिहासाची साक्ष देते. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेली ही बारव अजूनही सुस्थितीत असली तरी तिच्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि अनभिज्ञता यामुळे हा ऐतिहासिक ठेवा लुप्त होण्याआधी त्याचे संवर्धन आणि जतन करणे गरजेचे आहे."

- राकेश हिरे, इतिहास अभ्यासक, कळवण

"ओतूर येथील ऐतिहासीक बारव हे पुरातन वैभव असून, जास्तीत जास्त इतिहासप्रेमी व पर्यटकांना यासंदर्भात माहिती व्हावी व ही बारव अधिक चांगल्या प्रकारे सुशोभित करावी, यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करू."- नितीन पवार, आमदार, कळवण- सुरगाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT