Crime esakal
नाशिक

Nashik Crime : फर्नांडिसवाडीत गँगवॉरचा भडका! गोळीबार प्रकरणातील संशयिताला कोठडी

याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित संजय चमन बेद (३७, रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, उपनगर) यास अटक केली असून न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपनगर हद्दीतील जयभवानी रोड परिसरात फर्नांडिसवाडीत गेल्या गुरुवारी (ता. १) मध्यरात्रीला जुन्या वादाची कुरापत काढून सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाला याच्या घरासमोर सराईत गुन्हेगारांच्या टोळीने राडा घालत त्याच्या आईच्या दिशेने दोन राऊंड फायर केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित संजय चमन बेद (३७, रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, उपनगर) यास अटक केली असून न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. (outbreak of gang war in Fernandeswadi Suspect in shooting case in custody Nashik Crime)

बरखा अजय उज्जैनवाल (रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, जयभवानी रोड, फर्नांडिसवाडी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजय चमन बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, इर्शाद चौधरी, दीपक पाट्या, गौरव गांडले यांच्याविरोधात उपनगर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बरखा उज्जैनवाल यांचा मुलगा राहुल उज्जैनवाल याचे आणि संशयित टक्कू उर्फ सनी पगारे, मयुर बेद, संजय बेद यांच्यात वाद झाला होता.

मयुर बेद, संजय बेद यांच्या सांगण्यावरून संशयितांनी संगनमताने गुरुवारी (ता.१) मध्यरात्री उज्जैनवाल यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बाटल्या फोडल्या.

त्या आवाजाने बरखा उज्जैनवाल व त्यांचे पती हे घरातून बाहेर आले असता, संशयितांनी राहुलला समोर आणा नाहीतर तुमचा मुर्दा पाडतो असे म्हणत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले.

सुदैवाने यातून बरखा उज्जैनवाल या बचावल्या. या आवाजाने रहिवाशी जागे झाल्याने संशयितांनी दुचाक्यांवर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी संशयित संजय चमन बेद यास अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, संशयितांविरोधात मयुर बेद, संजय बेद व संशयितांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. तसेच, राहुल उज्जैनवाल याच्याविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगारांच्या आपसातील वादातूनच सदरचा प्रकार घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT