Turdal esakal
नाशिक

Inflation News: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! तूरडाळीच्या दरात विक्रमी वाढ

सकाळ वृत्तसेवा

Inflation News : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीसह मैदा, रवा, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी १३४ रुपये असलेली तूर डाळ १५२ रुपये किलोवर गेली असून, ती येत्या काही दिवसांत १७० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

हरभरा डाळीची मागणीही पोळ्यासह इतर सणामुळे वाढणार असल्याने नागरिकांचा खिसा कापला जाणार आहे. तांदळाचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तांदळाचे भाव आता स्थिर असले, तरी भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. (outbreak of inflation on eve of festive season Record rise in Pulses prices nashik)

श्रावण महिन्यात सण सुरू होतात. त्यात प्रत्येक वस्तूचा खप वाढतो. सणासुदीच्या काळात सर्वच पदार्थांची मागणी वाढते. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे फळे आणि भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे महागाईच्या काळात या गोष्टींच्या किंमती आणखी वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तूर डाळ, भाजीपाला, कडधान्यांच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. जून-जुलैच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च साधारणतः १५ टक्क्यांनी वाढल्याने खिशाला झळ बसली आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केल्याने वडापावपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच महाग झाले आहे.

"तूर व हरभरा डाळीची मागणी जास्त आणि साठा कमी आहे. पावसाचा परिणाम, तसेच आवक घटल्याने भाववाढ होते. डाळीचे दर दिवाळीनंतर कमी होतील. शिवाय गव्हाच्या दरात वाढ झाल्याने मैदा, कणिक आणि रव्याचे भाव कडाडले आहेत. साखरेच्या दरातही प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे."-ईश्वर बोथरा, होलसेल व्यापारी, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे वाढले दर (किलोमध्ये)

जून-जुलै सध्याचे दर

शेंगदाणा १२० १४०

ज्वारी ५० ६५

तूर डाळ १३० १५५

गहू (लोकवन एमपी) ३१ ३४

हरभरा डाळ ७० ८०

मूग डाळ १२० १३०-१४०

उडीद डाळ ११५ १३०-१४०

मसूर डाळ १३० १४०

साखर ३८ ४४

तांदूळ ६३ ६५

तांदूळ (एचएमटी) ४८ ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT