नाशिक

विधी महाविद्यालयात गटचर्चा

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. -- संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जावे -- प्रा. दाते : बियाणी विधी महाविद्यालयात गटचर्चा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : शहरातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अनुभवांतून शिकले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि जीवनात येणाऱ्या संकटांना व आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुषमा दाते यांनी केले. शहरातील एस. एम. बियाणी विधी महाविद्यालयातील मूट कोर्ट हॉलमध्ये ‘One Day You Will Lose Your Blue Bag’ या पुस्तकावर आधारित गटचर्चा व जीवनकौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रा. डॉ. आशिष गांगुर्डे, प्रा. अपर्णा पाठक, प्रा. मृण्मयी जोशी, प्रा. हितेश पाटील, प्रा. सुष्मिता पवार, श्रावणी गुडढेकर, जगदीश गायकवाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी पुस्तकावर आधारित गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पुस्तकातील विविध प्रसंग, विचार आणि संदेश यांवर आपली मते मांडली. पुस्तकातील विचारांचा स्वतःच्या जीवनाशी, अनुभवांशी व भविष्यातील वाटचालीशी संबंध जोडून विद्यार्थ्यांनी विविध संदर्भांसह विचार प्रभावीपणे व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नातेसंबंध, जबाबदारी, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवरही आपले दृष्टिकोन मांडले. संस्थेचे अध्यक्ष सीए के. यू. नाबरिया, सचिव शिल्पा म्हस्कर, उपाध्यक्षा ॲड. सारंगी गुजराती यांचे सहकार्य झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT