नाशिक

भाजपा नाशिक जिल्हा उत्तरची आढावा बैठक ओझर येथे संपन्न

CD
फोटो-14802 ओझर ः भाजपतर्फे झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष यतिन कदम. शेजारी भाजपचे प्रदेश महामंत्री तथा आमदार ॲड. माधवी नाईक, प्रदेश सचिव रोहिणी नायडू आदी. ओझरला भाजपची जिल्हा उत्तर बैठक सेवा संकल्प अभियानाचा आढावा; ‘सीआयआर’संदर्भातही चर्चा सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. ७ ः भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्हा (उत्तर) यांच्यातर्फे जिल्हास्तरीय आढावा बैठक ओझर येथील बाणगंगा सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झाली. जिल्हाध्यक्ष यतिन कदम अध्यक्षस्थानी होते. बैठकीस भाजप प्रदेश महामंत्री तथा आमदार ॲड. माधवी नाईक आणि प्रदेश सचिव रोहिणी नायडू उपस्थित होत्या. बैठकीत सेवा संकल्प अभियानाचा आढावा घेण्यात आला. ‘सीआयआर’संदर्भातही चर्चा झाली. विधानसभा प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस तसेच विविध मोर्चे व आघाड्यांचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. नंदकुमार खैरनार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा मांडला. बूथ पातळीपासून मंडल व जिल्हा पातळीपर्यंत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक यांनी पक्षाच्या उपक्रमांची अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि आगामी काळातील संघटनात्मक उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले. प्रदेश सचिव रोहिणी नायडू यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीमुळे संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळाली असून, सेवा संकल्प अभियानासह पक्षाच्या विविध उपक्रमांना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गोविंद कुशारे यांनी आभार मानले. .............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT