सेकंडमेन पान-१
OZM26B15015
-------------
ओझर मर्चंटच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांविरोधात अविश्वास
---------------
तेरा संचालकांच्या प्रस्तावाने खळबळ ः कामकाजात विश्वासात घेत नसल्याचा दावा
------------
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.१६ ः निफाड तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या ओझर मर्चन्ट को. ऑप बँकेत मोठी घडामोड घडली असून बँकेचे अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रेय शिंदे आणि उपाध्यक्ष प्रवीण पूनमचंद लढ्ढा यांच्याविरोधात तब्बल १३ संचालकांनी आक्रमक भूमिका घेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे.
--------------
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ आयडी व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या तरतुदीनुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संचालक मंडळात तीव्र असंतोष निर्माण झाला असून अर्जात अनेक आरोप करण्यात आले आहेत.
बँकेचे दैनंदिन कामकाज व धोरणात्मक निर्णयामध्ये संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जातात. हितसंबंधांची जपणूक व नियमांचे उल्लंघन केले जाते. सहकारी कायद्यातील तरतुदी व उपविधीचे उल्लंघन करून कर्जवाटप करण्यात आले असून प्रशासकीय खर्चात अनियमितता केली जात आहे. संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये इतर संचालकांच्या सूचना व हरकतींची नोंद न घेता संस्थेच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर विशेष सभा बोलावून अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात यावे अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे ओझरसह सहकार वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-------------
१६-१
संख्याबळ कोणाकडे?
बँकेच्या संचालक मंडळाची एकूण सदस्य संख्या १९ इतकी असून त्यापैकी १३ संचालक अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या अर्जावर भालचंद्र कासार, रवींद्र भट्टड, विजय शिंदे, भारत पलहाळ, नंदलाल चोपडा, योगेश चांडक, प्रवीण वाघ, शरद सिन्नरकर, नीळकंठ कदम, श्रीकांत कदम, गणेश बोरस्ते, जिजाबाई रास्कर, डॉ. मेघा पाटील आणि ज्योती भट्टड आदी संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------
कोट
बँकेच्या कामकाजात सुसूत्रता आणली खर्चावर नियंत्रण आणले बँकेच्या नफ्यात वाढ केली तसेच शंभर कोटींवरून ठेवी १३० कोटी व कर्ज वाटप ७५ कोटींवरून ९० कोटी केले. एनपीए १५ टक्क्यावरून ४.३५ टक्क्यांवर आणला आहे. ही प्रगती मी अध्यक्ष असताना झालेली आहे. हा प्रकार चुकीच्या प्रथांना पायबंद घातल्यामुळे विरोधकांनी केलेला डाव आहे.
- राजेंद्र शिंदे, अध्यक्ष, ओझर मर्चंट बॅंक.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.