ओझर-शिर्डी मार्ग रुंदीकरणास निधीसाठी प्रयत्न
कुंभमेळ्यामुळे महत्त्व ः उपमुख्यमंत्री पवारांचा मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२ ः सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ओझर- शिर्डी विमानतळ मार्ग रुंदीकरणासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पाठपुरावा सुरु केला आहे. आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर यांनीही निधी उपलब्धतेसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. एकीकडे कुंभमेळ्याच्या दृष्टीने ओझर-शिर्डी विमानतळ मार्गासाठी निधीची मागणी होत असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील वडगाव- नीळवंडे -कौठे कमलेश्वर मार्गासाठी ९७ कोटी रुपये कुंभमेळा प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहेत. त्यामुळे गरजेचा असलेला ओझर-शिर्डी मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
-----------
८५ किलोमीटर लांबीच्या ओझर-शिर्डी या मार्गाला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंजुरी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कुंभमेळा प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या गावांतूनही निधी उपलब्धतेबाबत अपेक्षा व्यक्त होत आहे. ओझर- खेरवाडी- चांदोरी- सायखेडा- भेंडाळी- हिवरगाव- वडांगळी- पंचाळे- वावी- सायाळे- जवळके- डोऱ्हाळे-शिर्डी विमानतळ हा सुमारे ८५ किलोमीटरचा मार्ग ग्रामीण, कृषी, औद्योगिक आणि धार्मिक भागांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे. दुचाकी, चारचाकी, एसटी बस, मालवाहू वाहने आणि कृषी वाहतुकीमुळे वर्दळीचा बनला आहे. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत या मार्गाची क्षमता अपुरी पडत आहे.
१६-१
धार्मिक पर्यटन जोडणारा मार्ग
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. चांदोरीजवळ हा मार्ग छत्रपती संभाजीनगर- नाशिक मार्गाला छेदतो, ज्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि शिर्डीकडून येणाऱ्या भाविकांना सिन्नर व नाशिक शहरातील गर्दी टाळून थेट कुंभस्नानाच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. यामुळे कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनात या मार्गाच्या रुंदीकरणाला मोठे महत्त्व आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.