नाशिक

घराघरात वाढतोय पॅकेज फूडचा वापर

CD
ॲंकर (फास्ट फूडचा संग्रहित फोटो वापरावा) ---- घराघरांत वाढतोय पॅकेज फूडचा वापर वेळेची बचत अन् चवीची आवड; आरोग्याबाबत मात्र जागरूकता गरजेची सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१७ : धावपळीची जीवनशैली, नोकरी-व्यवसायामुळे स्वयंपाकासाठी मिळणारा अपुरा वेळ आणि बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे जळगाव शहरात पॅकेज फूडचा वापर वाढत आहे. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तयार खाद्यपदार्थांना पसंती दिली जात असून, किराणा दुकानांपासून सुपरमार्केटपर्यंत पॅकेज फूडचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. चिप्स, बिस्किटे, नूडल्स, रेडी टू इट पदार्थ, फ्रोजन फूड, पॅकेज स्नॅक्स आणि तयार मसाल्यांचा वापर घराघरांत वाढताना दिसत आहे. पॅकेज फूडला पसंती का? नोकरी करणारे नागरिक, विद्यार्थी आणि व्यस्त कुटुंबांना झटपट तयार होणाऱ्या पदार्थांचा पर्याय सोयीचा वाटतो. बाजारात बिस्किटे, वेफर्स, इन्स्टंट नूडल्स, रेडी टू कुक पदार्थ, फ्रोजन फूड आणि तयार नाश्त्याचे अनेक पर्याय मिळतात, जाहिराती, आकर्षक पॅकिंग आणि विविध चवींमुळे लहान मुलांमध्ये पॅकेज स्नॅक्सची आवड वाढत आहे. दीर्घकाळ टिकणारे पदार्थ घरात साठवून ठेवता येत असल्याने अनेक कुटुंबे त्यांना प्राधान्य देतात, ऑनलाइन किराणा आणि खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेमुळे पॅकेज फूड घरपोच मिळणे सोपे झाले आहे. वाढती मागणी किराणा दुकानदारांच्या मते, ग्राहकांकडून बिस्किटे, वेफर्स, नूडल्स, रेडी टू कुक पदार्थ आणि विविध प्रकारच्या पॅकेज स्नॅक्सची मागणी असते. लहान पॅकपासून मोठ्या पॅकपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहक आपल्या गरजेनुसार खरेदी करतात. चौकट आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी? सर्व पॅकेज फूड आरोग्यासाठी हानिकारक असते, असे नाही. मात्र, जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी किंवा ट्रान्स फॅट असलेल्या अतिप्रक्रियायुक्त पदार्थांचे वारंवार सेवन टाळणे महत्त्वाचे आहे. खरेदीपूर्वी पाकिटावरील पोषणमूल्यांची माहिती वाचावी, मीठ, साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण तपासावे, उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि साठवणुकीच्या सूचना पाहाव्यात, पॅकेज फूडऐवजी शक्यतो ताजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि घरगुती नाश्त्याला प्राधान्य द्यावे. कोट सकाळी कामावर जाण्याची घाई असते. अशा वेळी झटपट तयार होणारे पदार्थ उपयोगी पडतात. मुलांनाही वेगवेगळ्या चवींचे पॅकेज फूड आवडते. मात्र, आता खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील घटक, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासण्याची सवय लावली आहे. शक्यतो घरचे ताजे अन्न खाण्यावर भर देतो. - राजे चौधरी, ग्राहक कोट पूर्वी ग्राहक प्रामुख्याने धान्य, डाळी आणि घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करायचे. आता त्यासोबत वेफर्स, बिस्किटे, नूडल्स आणि तयार खाद्यपदार्थांचीही मागणी असते. - किराणा दुकानदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Train Ticket Booking: तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही? रेल्वेची ही ट्रिक वापरा, मिळू शकतं कन्फर्म तिकीट!

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

Latest Marathi News Live Update : शिर्डीत ATM कार्डची अदलाबदल करून तरुणीला गंडा; ३ हजार रुपये लंपास

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT