नाशिक

केंद्रीय मंत्र्यांना साकडे

CD
(जागेनुसार कापता येईल) फक्त शहरासाठी) पाडळसरे धरणासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील सहा तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाला गती द्यावी तसेच धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी अमळनेरला भेट द्यावी, असे साकडे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने त्यांना घातले. समितीचे निमंत्रण स्वीकारत लवकरच अमळनेरला भेट देणार असल्याचे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले. सुरत येथे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पदाधिकारी एन. के. पाटील, नगरसेवक राजू फाफोरेकर, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील, छगनभाई पटेल आदी उपस्थित होते. पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश केल्याबद्दल जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांतर्फे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. पाडळसरे धरण हा परिसरातील शेती आणि पाणीप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, धरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने दुष्काळी परिस्थितीत त्याला गती देण्याची गरज असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यासाठी अमळनेरला भेट द्यावी, असे निमंत्रण त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: बोलता बोलता आला हार्ट अटॅक; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांबद्दल महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा

Pune News: बहिणीला भाऊबीजेसाठी घरी आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात भावाचा मृत्यू, नुकताच विवाह अन्..

SCROLL FOR NEXT