rice farming esakal
नाशिक

बेरवळ, मूलवडला भात लावणी खोळंबली; पावसाआभावी शेतकरी हवालदिल

दिनेशचंद्र तायडे

मूलवड (जि. नाशिक) : अचानक पावसाने दडी मारल्याने आदिवासी भागातील मूलवड, बेरवळ परिसरातील सुमारे तीन हजार हेक्टरवरच्या पेरण्या व भात लागवड खोळंबली आहे. रोहिण्या, मृग पाठोपाठ आर्द्र नक्षत्र कोरडे चालल्याने बळीराजाची तगमग वाढली आहे. या भागातील शेती संपूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने फक्त पावसाळ्यात भात, नागली, उडीद, काही प्रमाणात भुईमूग या पिकाची शेती केली जाते. यावरच येथील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. (Paddy cultivation has stopped at berwal and mulwad)


सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या अतिदुर्गम भागात शेतकरी शेतीची मशागत करून भात लावणीसाठी सज्ज असून, पावसाची वाट बघत आभाळाकडे टक लावून बसला आहे. अचानक पावसाने पाठ फिरवल्याने भात लागवडीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त हुकला आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने जेमतेम सुरवात केली असताना बळीराजा सुखावला होता. परंतु, दडी मारलेला पाऊस मृग नक्षत्रात चांगला होईल व लागवड करता येईल, अशी आशा होती. परंतु शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. मृग नक्षत्रात केलेली भात लागवड ही पिकांना पोषक व रोगराईपासून वाचविणारी असते. अशी शेतकऱ्यांची धारणा असल्यामुळे या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतात.


चालूवर्षी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे बळीराजा सुखावला होता, पण ऐन मृग नक्षत्रात अचानक पावसाने दडी मारल्याने आदिवासी शेतकरी शेतीची मशागत करून बसला आहे . सध्या भात लागवडीसाठी व इतर पिकांसाठी तयार आहे. त्यासाठी पावसाची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही.
- तुकाराम चौधरी, शेतकरी, गारमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT