टुडे पान ३, ॲंकर
NSK26H34865
जळगाव : चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे बलिप्रतिपदा अथवा पाडव्याला सुरेल संगीताची मैफिल पार पडली. या मैफिलीत सादरीकरण करताना कलावंत.
----
सुरेल स्वरांमध्ये रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट
उपशीर्षक
चांदोरकर प्रतिष्ठानची परंपरा; शास्त्रीय संगीतासह भक्तिगीतांची मैफिल
जळगाव, १२ : : दीपावलीच्या मंगलमय पहाटे शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने महात्मा गांधी उद्यानातील वातावरण भक्तिमय आणि संगीतमय झाले.
आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान आणि कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने आयोजित रौप्यमहोत्सवी ''पाडवा पहाट'' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, ज्येष्ठ विधिज्ञ खासदार ॲड. उज्ज्वल निकम, महापौर दीपमाला काळे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, दीपक चांदोरकर, पंडित सुभाष दसककर आणि मेजर नाना वाणी यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी आमदार सुरेश भोळे, माजी महापौर रमेश जैन, कॅप्टन मोहन कुलकर्णी, व्ही. एम. भट, पीयूष रावळ, स्वानंद झारे यांच्यासह शहरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आशिष रानडे यांनी रामकली रागातील बंदिश आणि ''दीपावली सूरके संग...'' या सादरीकरणाने केली. त्यानंतर आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी ''राधाधर मधुमिलिंद जय जय...'' ही रचना सादर केली. श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेले आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले ''राम का गुणगान...'' हे गीत रानडे आणि ईश्वरी यांनी सादर केले.
''हे श्यामसुंदर...'' ही रचना ईश्वरी दसककर-कदडी यांनी सुरेल सादर केली. पूजा दसककर यांनी ''ये जवळी घे, जवळी घे सखया भगवंता...'' या गीतातून भक्तिभाव जागवला. यमन रागावर आधारित ''मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश'' हे लोकप्रिय गीत ईश्वरी आणि पूजा यांनी सादर केले.
''आज अयोध्या सजली'', ''अमृताहुनी गोड नाम तुझे देवा'' आणि ''राम राम भजो राम...'' या रचनांचा सुरेख मेळ साधणारे मेडले ईश्वरी आणि पूजा यांनी सादर केले. ब्रह्मानंद स्वामी लिखित ''जय दुर्गे दुर्गती परिहारिणी'' हे पद आशिष रानडे यांनी सादर केले. यासोबतच ''माझे माहेर पंढरी'', ''भाग्यदा लक्ष्मी'' आणि कन्नड भजन अशा विविध रचनांनी मैफलीत भक्तिसंगीताचे रंग भरले.
या संगीत मैफलीत पं. सुभाष दसककर (संवादिनी), सुजित काळे (तबला), विजय नेवे (सिंथेसायझर) आणि नितेश पाटील (ॲक्टोपॅड) यांनी समर्थ साथसंगत केली. दीपिका घैसास यांनी सूत्रसंचालन केले, तसेच आभार मानले.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.