SNR26B23495
सिन्नर ः नर्मदा लान्स येथे श्री सांस्कृतिक मंचतर्फे पार पडलेला पाडवा पहाट कार्यक्रमात एक क्षण.
-----------
३०-३
लोकगितांच्या तालावर थिरकले सिन्नरकर
-----------
पाडवा पहाट रंगली ः सिन्नर सांस्कृतिक मंचतर्फे कार्यक्रम
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१२ ः पहाटेचा गोड गारवा आणि उपस्थितांचा ओसंडून वाहणारा उत्साह, लोकसंगीताच्या तालावर थिरकत आणि गाण्यांवर डोलणारे श्रोते अशा उत्साहपूर्ण वातावरणात येथील नर्मदा लॉन्सच्या हिरवळीवर, पहाट पाडवाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. श्री सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित कार्यक्रमास आबालवृद्धांसह रसिकांची गर्दी उसळली होती.
लोक कलारंजनचे उदय साटम निर्मित व दिग्दर्शित अस्सल लोकगीते व नृत्यकला सादर करत मराठी संस्कृतीला नमन केले. गायक दर्शन साटम, अभिषेक गाडेकर, ब्रह्मानंद पाटणकर, उमा गावड, संदेश शिंदे यांनी एकापेक्षा सरस गितांचे सादरीकरण केले. या विठूचा गजर, अलीकडे पलीकडे मल्हारवारी, कोकणातील पारंपरिक गा-हाणे, पिचली माझी बांगडी ही गवळण, चांगभलं, हलगी वाजती ही धनगर गीते, अंबाबाई लाड लाड ये, गार डोंगराची हवा, सात समंदर आटला ग बाई, अंबा बाई गोंधळाला ये, दार उघड बया, स्वराज्याच तोरण, राम जी कि निकली सवारी, भारत का बच्चा जय श्रीराम बोलेगा अशा लोकप्रिय लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
‘जयोस्तुते श्री महन्मगले’ या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित देशभक्ती स्तोत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. सावरकरांच्या वेशभूषेत आलेल्या कलाकाराला श्रोत्यांनी अभिवादन केले. श्री सांस्कृतिक मंचचे विवेक चांडक, विशाल चांडक, प्रमोद चोथवे, मनोज भगत, राजेंद्र देशपांडे यांनी स्वागत केले. दत्ता चाळके यांनी यांनी निवेदन केले.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.