नाशिक

वासननगर येथे बाजीराव फाउंडेशन तर्फे रंगली पाडवा पहाट

CD
पान दोन मेन ---------------- 13065, 13071, 18088 वासननगर:पाडवा पहाट मध्ये सादरीकरण करताना गणेश कड, सुरभी गौड आणि सहकारी. दुसऱ्या छायाचित्रात चेतनानगर येथे आयोजित सांज पाडवा मैफलीत सादरीकरण करताना गौरी गोसावी, अमोल पाळेकर आदी. तिसऱ्या छायाचित्रात बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दिवाळी पाडवा पहाट’ स्वरोत्सवात गीते सादर करताना नंदकुमार देशपांडे, अपर्णा देशपांडे, अपर्णा माडीवावले, सानिका जैन, मयुरी मुर्डेश्वर, संतोष कराळे, अमित गुरव व अन्य कलाकार. उपनगरांमध्ये ''पाडवा पहाट''चा सुरेल जल्लोष सुरांच्या अथांग सागरात न्हाऊन निघाली सकाळ; सुरांच्या सानिध्यात रसिक तल्लीन सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, डीजीपीनगर, नाशिक रोड, ता. १२ : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शहरातील इंदिरानगर, नाशिक रोड, डीजीपीनगर आदी उपनगरामध्ये पार पडलेल्या ''पाडवा पहाट''च्या रंगतदार मैफिलींना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिली. पाडवा पहाटमुळे रसिकांना शास्त्रीय आणि सुगम संगीताची अनोखी मेजवानी मिळाली. दिग्गज कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. बाजीराव फाउंडेशन वासन नगर येथील गामने मैदानात बाजीराव फाउंडेशनतर्फे आयोजित पाडवा पहाट मैफल रंगली. गायक गणेश कड, अर्जुन तांबे, सुरभी गौड यांनी सादर केलेल्या मराठी ,हिंदी भावगीते आणि भक्तिगीतांना मोठा प्रतिसाद मिळाला. संस्थापक साहेबराव आव्हाड आणि माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘उठी उठी गोपाला’ , ‘शंभो शंकरा’, ‘वसुदेवाची स्वारी’, ‘ह्रदयीवसंत फुलतांना’, आदी गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. अतुल गांगुर्डे , विशाल चौधरी, जतीन दाणी , कैलास गुरव ह्यांनी संगीत साथ दिली . नागरिकांनी गीतांच्या तालावर नृत्याचा आनंद घेतला. या वेळी नगरसेवक, भाजप गटनेते ॲड.श्याम बडोदे, सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक चंद्रकांत खोडे, भगवान दोंदे, डॉ.पुष्पा पाटील नवले, रमेश जगताप, गणेश ठाकूर, सुभाष महाले, उत्तम सानप, रूपेश शिंदे, उत्तम उघडे,प्रकाश चव्हाण आदींसह जानकी महिला मंडळ , मॉर्निग ग्रुप, गजानन हास्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. युनिक ग्रुप राजीवनगर येथील भगवती चौकात पाडवा पहाट निमित्त युनिक ग्रुप तर्फे आयोजित ‘या सुखांनो या’ या आशा भोसले यांच्या अजरामर गीतांच्या मैफलीचा शेकडो श्रोत्यांनी आनंद घेतला. माजी सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी आयोजन केले होते. विवेक केळकर आणि तृप्ती देब यांनी सादर केलेल्या आशाजींच्या ‘उठी गोविंदा’ या गीताने मैफलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी सदर केलेल्या ‘जय शारदे वागीश्वरी’," या सुखांनो या’ यासह इतर अजरामर गीतांनी श्रोत्यांना चिंब केले. "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आभाळ" या गीताने मैफलीचा शेवट करण्यात आला. तत्पूर्वी सतीश सोनवणे आणि अनिता सोनवणे यांनी स्वागत केले. प्रज्ञा कुलकर्णी यांच्या बहारदार निवेदनाने रंगत आणली. दिव्या रानडे, जितेंद्र सोनावणे, आशिष ढेकणे, सौरभ शिंत्रे, फारूक पिरजादा, पराग जोशी यांनी साथसंगत केली. अनिकेत सोनवणे यांनी आभार मानले.मंडळाचे अध्यक्ष शैलेश कुलकर्णी,संतोष कुलकर्णी, सानिका सोनवणे, किशोर शिरसाठ, महेंद्र राजपूत, शिवाजी लोखंडे आदींनी संयोजन केले. इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळ ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘खेळताना बाई रंग होळीचा’ या लावण्या सोबत ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा’, ‘रुपेरी वाळूत’ आदी गीतांचे सादरीकरण करणारी सारेगम लिटिल चॅम्प गौरी गोसावी आणि तिच्या गीतांना श्रोत्यांनी दिलेल्या वन्स मोअर आणि टाळ्यांनी दिलेल्या भरभरून दाद अशा उत्साही वातावरणात चेतनानगर येथील इच्छापूर्ती उद्यानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळाची सांज पाडवा मैफल रंगली. प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका वैशाली दळवी आणि उपमहानगर प्रमुख बंडू दळवी यांनी ही मैफल आयोजित केली होती. या वेळी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सुनील अंकोलीकर, भूषण सोनार, स्वाती पाटील, जयंत दिंडे, गटनेते केशव पोरजे, सुभाष गायधनी, नगरसेविका प्रमिला मैंद, वैशाली दाणी, माधुरी डेमसे,नगरसेवक योगेश गाडेकर, योगेश भोर मदन डेमसे,निलेश साळुंखे आदी प्रमुख पाहुणे होते. गौरी सह अमोल पाळेकर, संदीप थाटसिंगार, सुरभी गौड, अमित पगारे आणि स्वरा थोरात यांनी सादर केलेल्या गीतांना देखील श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. मंडळाचे अध्यक्ष अभिजीत खरोटे, महेश चव्हाण, कौस्तुभ दळवी, विकास शर्मा,रमेश वरपे, रोशन विचारे, संदीप खरोटे आदींसह पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. डीजीपी नगरात सुरेल स्वरांनी रसिक मग्न भक्तिसंगीताचा स्वरानुभव आणि मराठी-हिंदी चित्रपटगीतांची सुरेल बरसात अशा अनोख्या संगमाने ‘दीपावली पाडवा पहाट’ संगीत मैफल रंगली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र आणि पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांच्या बहारदार गायनाने रसिकांना स्वरानंदाची अविस्मरणीय मेजवानी दिली.‘ श्री विघ्नहरण गणेश’ प्रांगणात आयोजित या सोहळ्यात दोन हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावली. माजी महापौर सतीश कुलकर्णी आणि नगरसेविका संध्या कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पहाटे साडेपाचला मैफिलीचा प्रारंभ झाला. ‘सूर निरागस हो’ या भक्तिगीताने मैफिलीचे सूर जुळले. ‘ऐसी लागी लगन’,‘माझे माहेर पंढरी’, ‘कानडा राजा पंढरीचा’,‘सुंदर ते ध्यान’ या अभंग-भक्तिगीतांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर ‘राधा ही बावरी’,‘पाहिले ना मी तुला’,‘खेळ मांडला’,‘केव्हा तरी पहाटे’,‘वीण दोघांतली तुटेना’ यासह अनेक लोकप्रिय गीतांनी रसिकांची मने जिंकली.‘सार्वजनिक उत्सव समिती, डीजीपी नगर हाउसिंग सोसायटी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान, वंदे मातरम् प्रतिष्ठान तसेच विविध संस्थांचे सहकार्य लाभले. बालाजी सोशल फाउंडेशन नाशिकरोड, ता. १२ : सुरेल गीतांची मैफल, विविध वाद्यांची मधुर साथ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दिवाळी पाडवा पहाट’ स्वरोत्सव उत्साहात पार पडला. शिखरेवाडी येथील बालाजी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला दोन हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावली. मैफलीत नंदकुमार देशपांडे व सहकाऱ्यांनी हिंदी-मराठीतील लोकप्रिय गीतांचे सादरीकरण केले. नगरसेवक कैलास मुदलीयार, नाना नगरकर, विजय उपाध्याय, राजाभाऊ वाघ आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सुनील ढगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. झाले. अपर्णा देशपांडे, अपर्णा माडीवावले, सानिका जैन, मयुरी मुर्डेश्वर, संतोष कराळे आणि अमित गुरव यांनी ‘प्रथम तुला वंदितो’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘आली माझ्या घरी दिवाळी’, ‘या जन्मावर, या जगण्यावर’, ‘विठू माऊली’, ‘नाच नाच नाच राधे’, ‘बुगडी माझी सांडली गं’ आणि ‘जीवा शिवाची बैलजोड’ या गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

SCROLL FOR NEXT