नाशिक

टोमँटो जाळीला मिळाला ६०१ रुपये दर पांढुर्लीत उपबाजाराला सुरुवात, पहिल्याच दिवशी नऊ हजार जाळ्यांची आवक

CD
फोटो-23050 पांढुर्ली ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात टोमॅटो लिलाव सुरू करताना बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी. टोमॅटो जाळीला मिळाला ६०१ रुपये दर पांढुर्लीत उपबाजाराला सुरुवात; पहिल्याच दिवशी नऊ हजार जाळ्यांची आवक सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ११ ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजाराला रविवारी (ता. ११) सुरुवात झाली. टोमॅटो जाळीला उच्चांकी ६०१ रुपये दर मिळाला. पहिल्याच दिवशी नऊ हजार जाळ्यांची आवक झाली आहे. बाजार समितीचे उपसभापती सिधू कोकाटे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. संचालक प्रकाश तुपे, जालिंदर थोरात, विकास वाजे, अनिल शेळके, सुनील चकोर, रवींद्र शेळके, गणेश घोलप, सचिव विजय विखे आदी उपस्थित होते. आठवड्यातील सर्व दिवस टोमॅटो लिलाव सुरुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जात आहेत. संजय किसन पवार यांच्या टोमँटोला ६०१ रुपये दर मिळाला. सरासरी ४५० दर मिळाला आहे. अनिल हारक, दत्ता हारक, शौकत बागवान, शौकत सरदार बागवान, बाळासाहेब दळवी, लक्ष्मी ट्रेडींग कंपनी दत्तु गडगे, अमोल खोल्लम, अण्णा हारक, निवृत्ती चव्हाणके, शालीमार ट्रेडींग कंपनी, श्रीगणेश ट्रेडींग कंपनी, संतोष जोशी, नितीन आरोटे, समाधान तुपे आदी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला. नुकसान टाळण्यासाठी शेती बांधावर किंवा शिवारमापाने टोमॅटो शेतमालाची विक्री न करता टोमॅटो शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले. बाजार समितीचे सचिव विजय विखे, दिलीप पाटोळे, रंगनाथ डगळे, अर्जुन भांगरे राहुल पवार आदि यांनी उपस्थित राहून लिलाव कामकाजात सहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT