MGNREGA
MGNREGA  esakal
नाशिक

MGNREGA News : दुखणं ऑनलाइन हजेरीचं अन् बदनामी मात्र मोबाईल ॲपची!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन हजेरी घेण्याचा नवा नियमकेंद्र सरकारने एक जानेवारीपासून अमलात आला आहे. तेव्हापासून मजुरांच्या हजेरीत पारदर्शकता आली असून, यंत्राद्वारे काम घेणाऱ्या ठेकेदारांचे मात्र धाबे दणाणले आहे. (Pain of online presence and infamy of mobile app MGNREGA nashik news)

त्यामुळे रोजगार हमी योजनेतून केवळ मनुष्यबळाचा वापर करून काम पूर्ण करण्यावर मर्यादा असल्याने सरकारने प्रत्येक कामात कुशल व अकुशल कामे अशी विभागणी करून त्याचे प्रमाण ६० : ४० असे निश्चित केले आहे.

यामधून ६० टक्के काम यंत्राच्या सहाय्याने व ४० टक्के काम मजुरांच्या सहाय्याने करण्याचे धोरण ठरवले आहे. मात्र या नियमांचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी मजुरांची हजेरी केवळ कागदोपत्री दाखवत पूर्ण काम यंत्राच्या साह्याने केल्या जात असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने २० पेक्षा अधिक मजूर असलेल्या कामांवर मोबाईल ॲपच्या माध्यमातून हजेरी नोंदविण्याचा एक जानेवारी २०२३ पासून (नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम) या ॲपच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

मात्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MNERGA) कामांवरील मजुरांची नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिम या मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन हजेरी घेण्याचा हा नवा नियम अनेक ठिकाणी मानवलेला नाही. नव्या नियमामुळे मजुरांच्या जागी यंत्राद्वारे सुरू असलेली रोजगार हमीची कामे ठप्प पडली आहे.

मोबाईल अँपद्वारे हजेरीचा नियम रोजगार हमीच्या सरसकट कामांसाठी लागू झालेला हा नियमामुळे अनेक ठेकेदारांच्या बिल निघण्यात अडसर ठरला आहे. ऑनलाइन हजेरीचा पारदर्शकतेचा हा अडसर नको म्हणून मोबाईल अँपमध्ये त्रुटी असल्याचे कारण देत अनेक ठिकाणी रोजगार हमीच्या कामांना ब्रेक लावला गेला आहे.

बहुतांश रोजगार हमीची कामे ही दुर्गम भागात होत असल्याने तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याचे कारण देत सगळे खापर मोबाईल ॲपच्या मारुन ऑनलाइन हजेरी नोंदवण्यास अडचणी येत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT