नाशिक

अस्सल पैठणीचा बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये जागतिक फॅशनविश्वासमोर दिमाखदार आविष्कार!

CD
फोटो- 27368 मुंबई : ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’प्रसंगी मंत्री छगन भुजबळ, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रकाश सुर्वे, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आदी. पैठणीचा ‘फॅशन वीक’मध्ये दिमाखदार आविष्कार शेपाली भुजबळ यांची संकल्पना; ‘वीण-द विव्ह’ उपक्रमाचे सादरीकरण सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : समृद्ध वस्त्रपरंपरेचा अनमोल ठेवा असलेल्या येवल्याच्या अस्सल पैठणीला आधुनिक फॅशनविश्वात नवी ओळख मिळवून देणारा ‘वीण-द विव्ह’ हा विशेष उपक्रम ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये दिमाखात सादर करण्यात आला. ग्रँड हयात (सांताक्रूझ, मुंबई) येथे झालेल्या या प्रतिष्ठित फॅशन सोहळ्यात भुजबळ इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आणि डॉ. शेफाली भुजबळ यांच्या संकल्पनेतून, डिझायनर पल्लवी गोयल यांनी पैठणीच्या पारंपरिक विणकामाचा आधुनिक फॅशनशी सुरेख संगम घडवून आणला. मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा वस्त्रवारसा, सर्जनशीलता आणि विणकरांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश जागतिक फॅशनविश्वापर्यंत पोहोचविण्यात आला. पैठणीची समृद्ध परंपरा आणि विणकरांच्या कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्याचा हा अनमोल वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. या फॅशन शोमध्ये अस्सल पैठणी वस्त्रांचा वापर करण्यात आला. पारंपरिक पैठणीच्या वैशिष्ट्यपूर्ण विणकामाला आधुनिक डिझाइनची जोड देत आकर्षक ड्रेप्स, लेहेंगा, फेस्टिव्ह वेअर आणि विविध फॅशन अ‍ॅक्सेसरीज साकारण्यात आल्या. विशेषतः महिला विणकरांच्या योगदानाला आणि त्यांच्या कौशल्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. पैठणीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी महिला विणकर घेत असलेले कष्ट, त्यांची कलात्मकता, समर्पण आणि कौशल्य यांचा गौरव करण्यात आला. डॉ. शेफाली भुजबळ यांच्या पुढाकाराने परंपरेचे जतन करण्यात आले. डिझायनर पल्लवी गोयल यांनी आपल्या डिझाइनच्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिले. येवल्याच्या अस्सल पैठणीला आधुनिक पेहरावामध्ये नव्या पद्धतीने सादर करत पारंपरिक विणकामाची जागतिक फॅशनविश्वातील उपयुक्तता आणि आकर्षकता प्रभावीपणे दाखवून दिली. या वेळी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर उपस्थिती लावली. पारंपरिक पैठणीचा आधुनिक अंदाज आणि भारतीय वस्त्रकलेचे सौंदर्य यांचा संगम असलेल्या या विशेष सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. सोहळ्यात मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रकाश सुर्वे, मिलिंद नार्वेकर, सत्यजित तांबे, वर्षा पटेल, अभिनेत्री नेहा पेंडसे, प्राजक्ता दातार तसेच माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ आदी उपस्थित होते. ................ कोट ‘वीण-द विव्ह : अ भुजबळ इनिशिएटिव्ह’ या उपक्रमाच्या माध्यमातून येवल्याच्या पैठणीने बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये वेगळी छाप उमटविली. परंपरेचा अभिमान, कारागिरांच्या कलेचा सन्मान आणि आधुनिकतेची नवी दिशा यांचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या या उपक्रमामुळे पैठणीच्या वैभवाला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले. -छगन भुजबळ, मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र .........

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Mangalwedha Accident: कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू

Ghodegaon electricity issue: आठ दिवसांपासून वीज गायब; घोडेगावातील ३० हेक्टरवरील पिके करपली

IND vs NZ, T20I: पहिल्या ३ सामन्यांत लय सापडली, पण शेवटच्या २ मध्ये काय बिनसलं? श्रेयस अय्यर म्हणाला, 'एका गोष्टीत सुधारणा हवी...'

SCROLL FOR NEXT