नाशिक

कर्तव्य बजावणाऱ्या दुर्गांचा पैठणी देऊन सन्मान

CD
फोटो : NSK26H33447 नंदुरबार : पैठणी देऊन महिलांचा गौरव करताना ऐश्वर्या रावल, सोनाली बागुल, विजयादेवी रावल, किरणकुवर रावल, वैशालीदेवी रावल, कुसुमदेवी रावल, विशाखादेवी रावल, रेश्मा पोतदार आदी. ----------- कर्तबगार महिलांचा पैठणी देऊन सन्मान गरबा स्पर्धेतील विजेत्यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही गौरव सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. २५ : नवरात्रनिमित्त सुरू असलेल्या गरबा- दांडिया स्पर्धेतील विजेत्या महिलांना भेटवस्तू, तर सहभागी महिलांचा पैठणी शालूने सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे गृहरक्षक दलाच्या भगिनी आणि परिसराची स्वच्छता ठेवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचाही या वेळी पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला. सारंगखेडा येथील श्री वाघेश्वरी माता मंदिराच्या प्रागंणात चेतक फेस्टिव्हल समितीतर्फे गरबा- दांडीया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. गरबा स्पर्धेमध्ये महिला, युवती व बालगट अशा तीन गटात स्पर्धा सुरू होत्या. प्रत्येक गटातील रोज दोन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जात होती. नवव्या दिवशी तीन गटातील विजेत्या स्पर्धकांचा अंतिम स्पर्धा झाल्या. त्यात दांडीया क्वीन नम्रता रवींद्र कुवर यांना वॉशिंग मशीन, महिला गटातून माधुरी संतोष मोरे यांना ट्रॉली बॅग, युवती गटातून प्रथम कामिनी गिरासे यांना टॅप, बालगटातून मोहिनी कोळी यांना स्टडी टेबल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. विजेत्यांना माजी जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सोनाली बागूल, विजयादेवी रावल, किरणकुवर रावल, वैशालीदेवी रावल, कुसुमदेवी रावल, विशाखादेवी रावल, रेश्मा पोतदार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. या वेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, सनराईज शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पोतदार, रमेश पाटील आदी उपस्थित होते. परिक्षक म्हणून विवेक देवरे, सचिन पावरा होते. अजय पाटील, प्राजक्ता खैरे यांनी परिश्रम घेतले. आर. बी. राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. ------- पैठणीने महिलांचा सन्मान गरबा- दांडीया स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक महिलांचा लकी ड्रॉद्वारे रोज चार महिलांना पैठणी साडी दिली जात होती. स्वच्छतेपासून संरक्षणापर्यंत विविध पातळीवर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना दुर्गाष्टमीनिमित्त पैठणी देत सन्मानित करण्यात आले. या महिलांच्या चेहऱ्यांवर आनंद आणि कर्तव्यपूर्तीसाठी केलेल्या कष्टाची देखील कोणीतरी दखल घेत आहे, या भावनेने कृतकृत्यता जाणवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT