Ishtiaq Ahmed with Dr. Rahul ranalkar
Ishtiaq Ahmed with Dr. Rahul ranalkar esakal
नाशिक

Coffee With Sakal Ishtiaq Ahmed : पाकिस्तानने लोकशाहीप्रधान राष्ट्र व्हावे! इश्‍तियाक अहमद

सकाळ वृत्तसेवा

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, निवडणुकांनंतर बहुमत आणि विकास हे मोठे यश आहे. मात्र पाकिस्तान सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश असून, त्यामुळे विविध प्रश्‍न तयार झाल्याचे आपणाला दिसते.

पण पाकिस्तान हे लोकशाहीप्रधान राष्ट्र व्हायला हवे, असे पाकिस्तानच्या राजकीय इतिहासाचे अभ्यासक, लेखक आणि प्रोफेसर इश्‍तियाक अहमद यांनी सांगितले.

तसेच चीनचा पाकिस्तान हा मित्र असल्याचे सांगत त्यांनी चीनला मैत्रीतून परताव्याची अपेक्षा आहे, असेही स्पष्ट केले. (Pakistani author Ishtiaq Ahmed statement on Coffee With SAKAL Pakistan should become democratic nation nashik news)

‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात इश्‍तियाक अहमद बोलत होते. यशवंतराव महाराज पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेसाठी स्वीडनहून ते नाशिकमध्ये आले आहेत.

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यावर पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या तणावाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने इश्‍तियाक अहमद यांनी पाकिस्तानमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ते म्हणाले, की इम्रान खान हे सत्तेबाहेर गेल्यावर पाकिस्तानमध्ये त्यांनी आंदोलनाची धार तीव्र केली होती. त्यांचा चाहता वर्ग पाकिस्तानमध्ये अधिक आहे. खरे म्हणजे, पाकिस्तानमधील चुकीच्या व्यवस्थापनाबद्दल इम्रान खान हे प्रश्‍न उपस्थित करत होते.

भारताशी रोजची तुलना

पाकिस्तानमधील नागरिक भारतीयांशी दररोज सकाळ-संध्याकाळ तुलना करत असतात. भारतातील कांदा दुबई, इराणमार्गे पाकिस्तानमध्ये येतो. त्यामुळे कांद्याचा किलोचा भाव पाकिस्तानी चलनात दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पोचला.

दैनंदिन गरजांची महागाई तिप्पट झाली. औषधे महाग आहेत. इम्रान खान यांनी सत्तेत येण्यापूर्वी कराचीमधील कर्करोग रुग्णालयाच्या अनुषंगाने परदेशातून १६१ रुपयांमध्ये, तर भारतातून ५२ रुपयांमध्ये गोळी मिळते, याचे उदाहरण दिले होते.

ही सारी परिस्थिती पाहता, पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती नव्हे, तर शांतता हवी आहे. शस्त्रास्त्रांवरील प्रचंड खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम करत आहे, असे सांगत इश्‍तियाक अहमद यांनी पाकिस्तानमध्ये विचारधारेच्या चौकटीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे अंगुलिनिर्देश केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाकिस्तानमध्ये घेतले गेलेत निर्णय

इश्‍तियाक अहमद म्हणाले, पाकिस्तानमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यातील ठळक मुद्द्यांमध्ये ‘तलाक’च्या अनुषंगाने घेतलेला निर्णय, विवाहाचे मुलीचे वय १६ वर्षांवरून १८ वर्षे करणे, विधवेच्या मुलांना मालमत्तेचा अधिकार याचा समावेश होतो. मुळातच, इस्लाममध्ये समान अधिकार असल्यानंतर महिलांना डावलणे चूक ठरते.

इश्‍तियाक अहमद म्हणालेत...

- पाकिस्तानमधील जमात ए इस्लामच्या नेत्यांच्या कुटुंबांमध्ये लग्न सोहळ्यात लतादीदींचे गाणे वाजवले गेले. यातून भारतीय संगीताची लोकप्रियता समजते.

- माझे आवडते संगीतकार सी. रामचंद्र यांचे गाव नाशिकशेजारील नगर जिल्ह्यातील असल्याचे ऐकल्यावर छान वाटले.

- अभिनेते दिलीपकुमार यांचे बालपण देवळाली कॅम्पमध्ये गेले आणि अभिनेते विनोद खन्ना यांचे शिक्षण बार्न्स स्कूलमध्ये झाले ही माहिती नाशिकमध्ये मिळाली.

- जगभर निर्यात होणाऱ्या कांद्यातील नाशिककरांच्या योगदानाविषयी ऐकायला मिळाले, ही चांगली बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: 14 लोकांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT