नाशिक

नैसर्गिक पर्यटन क्षेत्र अन्‌ सशक्त अध्यात्मिक केंद्र

CD
निसर्ग पर्यटन ------- NSK26H32307 रावेर : तालुक्यातील सातपुड्यातील पाल हे पर्यटनस्थळ.. पालकडे जाताना ‘जंगल सफारी’चाही आनंद घेता येतो.. ---- NSK26H32306 पाल : येथील रम्य परिसरात स्थित ‘ए’ हट.. ----- NSK26H32305 (दिलीप वैद्य) ----- NSK26H32330 पाल : संत श्री लक्ष्मण चैतन्यबापूजी स्थापित श्रीकृष्ण मंदिर, वृंदावन धाम. (सर्व छायाचित्रे : दिलीप वैद्य, गणेश भोई) ------- सशक्त आध्यात्मिक केंद्र --------------------- पाल : नैसर्गिक पर्यटन क्षेत्र रावेर तालुक्यातील पाल हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पूर्वी प्रसिद्ध होते. आताही वर्षभरात शेकडो पर्यटक पालसह परिसरातील सुकी मध्यम प्रकल्पाला भेट द्यायला आणि लंगडा आंबा या सातपुड्यातील घनदाट जंगलातील जीवन पाहण्यासाठी भेटी देतात. गेल्या वीस- पंचवीस वर्षात भारतातील श्री चैतन्य साधक परिवाराचे आध्यात्मिक केंद्र म्हणूनही पालचा विकास होत आहे. - दिलीप वैद्य, रावेर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये व यावल वन्यजीव अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातील निसर्ग सानिध्यात नटलेले गाव म्हणजे पाल. समुद्रसपाटीपासून ३९७ मीटर उंचीवर असलेल्या पालमध्ये असंख्य ऐतिहासिक वास्तू आणि जुन्या किल्ल्याचे अवशेष आढळतात. मुघल कालीन शाही जामा मशीद, श्री लक्ष्मण चैतन्य बापूंचे वृंदावन धाम मंदिर व आश्रम, प्राचीन महादेव मंदिर ही येथील वैशिष्ट्ये आहेत. रावेरपासून सुमारे २४ किलोमीटर, भुसावळपासून ४८, यावलपासून ४३ आणि जळगावपासून ६३ किलोमीटर अंतरावर पाल हे ठिकाण आहे. सुमारे ७ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १४७१ घरे आहेत. आदिवासी, पावरा, बंजारा, भिल, तडवी अशी संमिश्र वस्ती येथे आढळून येते. गावची रचना अन्‌ इतिहास अलीकडे येथील प्राचीन वास्तूंची तटबंदी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एक जीर्ण बुरुज, किल्ल्याचे प्रवेशद्वार, १ प्रार्थना स्थळ, जीर्ण झालेला हत्तीखाना, पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातील जुने पण सुस्थितीत असलेले कुंड यांचे अवशेष आजही आढळून येतात. प्राचीन काळी गवळी राजा आभीर याचे हे मुख्यालय होते. नंतरच्या काळात आलेल्या मुघल शासक फारुखीचे आणि ब्रिटिश सैन्याचेही हे मुख्यालय होते. खानदेशातून उत्तर भारतात जाण्याच्या मार्गावरील त्या त्या राजाच्या काळातील लष्कराची छावणी येथे होती. येथून जवळच सुमारे २० किलोमीटर सातपुड्याच्या अंतर्गत भागात असलेल्या लंगडा आंबा येथे इंग्रजांनी १८९२ मध्ये बांधलेले विश्रामगृह आजही सुस्थितीत आहे. या भागात इंग्रज शिकार, विश्रांती आणि पर्यटनासाठी येत असत. पाल येथील सुंदर बगीचा, अनुपम हे शासकीय विश्रामगृह, संपूर्ण लाकडात बनवलेली इंग्रजी ‘ए’ आकाराची झोपडी (‘ए हट’), झुलता पूल, खळाळून वाहणारी सुकी नदी आणि हरिण पैदास केंद्र ही येथील आकर्षणाचे ठिकाणे होती. काळाच्या ओघात झुलता पूल मोडकळीस आला आहे. श्री लक्ष्मण चैतन्य बापूंचा आश्रम सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी येथे चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक संत श्री लक्ष्मण चैतन्य बापू महाराज यांनी त्यांचे गुरू श्री चैतन्य दगडू बापू यांच्या प्रेरणेतून पाल येथे छोटासा आश्रम सुरू केला. आश्रम कसला एक छोटीशी झोपडीच होती ती! वयाच्या आठव्या वर्षापासून ते त्या झोपडीत बसून साधना व तप करीत. हळूहळू त्यांचा शिष्य संप्रदाय वाढला. सर्वच जाती धर्माच्या संत परंपरेचा अभ्यास करून त्यांनी सर्वांनाच या चैतन्य साधक परिवारात जोडले. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ येथील साधक मोठ्या संख्येने ब्रह्मलीन संत लक्ष्मण चैतन्य बापूंचे शिष्य आहेत. त्याचबरोबर पालला लागून असलेल्या सातपुडा पर्वतातील मध्यप्रदेश मधील खरगोन, बऱ्हाणपूर, बडवाह, सनावद झिरण्या, खंडवा या भागातील शिष्यवर्गही हजारोंच्या संख्येने त्यांना गुरुस्थानी मानतो. या आदिवासी बांधवांना व्यसनमुक्त करून त्यांना आध्यात्मिकतेकडे वळविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र सुमारे १५ वर्षांपूर्वीच वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ते ब्रह्मलीन झाले. सध्या त्यांच्या गादीवर संत श्री गोपाल चैतन्य बापू महाराज हे विराजमान आहेत. आश्रम.. हिरवाईने नटलेला परिसर आश्रमात प्रवेश करताच आपल्याला दिसून येतो, तो अतिशय सुंदर हिरवाईने नटलेला निसर्गरम्य परिसर. या परिसरात भगवान श्रीकृष्णाची अतिशय सुरेख मूर्ती आहे. या सर्व स्थळाला त्यांनी ''श्री वृंदावन धाम'' असे नाव दिले आहे. सातपुड्यातील आदिवासी बांधव उत्तर भारतातील वृंदावनला केव्हा जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतील? त्यापेक्षा तशी संधी त्यांना पालमध्येच देऊ या भावनेतून त्यांनी या मंदिराचा संकल्प केला होता. आपल्या महाप्रयाणापूर्वीच त्यांनी या मंदिरासाठी लागणाऱ्या श्रीकृष्ण, गणेश, हनुमान यांच्या अत्यंत सुंदर, सुबक मूर्ती राजस्थानमधून आणून ठेवल्या होत्या. राजस्थानमधूनच मागवलेल्या लाल रंगाच्या पाषाणातून या भव्य मंदिराची निर्मिती झाली आहे. मंदिरातील प्रसन्न वातावरण, स्वच्छता आणि शांतता या भाविक हरवून जातात. या आश्रमात २ गोशाळा असून सुमारे २०० गाईंचे पालन येथे केले जाते. संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूंच्या वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालयही येथे आहे. सांदीपनी गुरुकुल स्थापन मंदिर परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून सांदीपनी गुरुकुलही स्थापन करण्यात आले आहे. १९९० पासून या मंदिरात अखंड नामसंकीर्तन २४ तास सुरू असते. परिसरात वृद्धाश्रमही आहे. येणाऱ्या भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्थाही आश्रमात करण्यात येते. याच परिसरात भव्य सत्संग मंडप उभारण्यात आला आहे. वर्षातून अनेकदा येथे हजारो भाविक सत्संगाचा लाभ घेतात. गुरू पौर्णिमा, होळी आणि धुलीवंदन, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, संत लक्ष्मण चैतन्य बापूंची जयंती, पुण्यतिथी असे विविध उपक्रम येथे उत्साहात साजरे होतात. भारतातील ८ राज्यांमध्ये या अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या शाखा आहेत. व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा असे उद्देश घेऊन येथे कार्य केले जाते. या आश्रमाचे साधक शिष्य आणि सामान्य नागरिक ग्रामस्थही मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने आश्रमाची सेवा करतात. पाल येथे पर्यटनाला आलेला पर्यटक या आश्रमात आल्यावर निसर्ग सानिध्यात हरवूनच जातो. आश्रमाचा व्याप भला मोठा असूनही व्यावसायिकतेचा कुठेही स्पर्श येथे झालेला नाही. गारबर्डी धरणास पर्यटकांची पसंती येथून जवळच सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या सुकी नदीवरील गारबर्डी गावाजवळील सुकी लघुसिंचन मध्यम प्रकल्पालाही पर्यटक आवर्जून भेट देतात. परिसरातून पावसाळ्यात खळाळून वाहणारे झरे, हिरवीगार वनराई आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्व यामुळे पर्यटकांचा ओढा या भागात असतो. अलीकडच्या काळात वनविभागाने जंगल सफारी हा उपक्रम सुरू केला आहे. या जंगल सफारीच्या मार्गात वाघ, बिबट, अस्वल, हरीण, माकड, ससे यांच्यासह असंख्य पशुपक्षी दृष्टिपथास पडतात आणि निसर्ग सानिध्यात भ्रमंतीही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Lift Collapsed: नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना! सात मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; Video Viral

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचा 'जनमहाभियोग'; दिल्लीत भरवली मॉक पार्लमेंट, राहुल गांधींचे असणार अंतिम भाषण

SCROLL FOR NEXT